AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Indians : पहिल्याच सामन्यात मुंबईपुढे आरसीबीचं आव्हान, मॅच कधी? पाहा पलटणचं संपूर्ण वेळापत्रक

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. पाचही संघ मेगा लिलावानंतर सज्ज झाले आहेत. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने संघांची बांधणी केली असून कधी आणि केव्हा सामने होणार ते जाणून घ्या.

Mumbai Indians : पहिल्याच सामन्यात मुंबईपुढे आरसीबीचं आव्हान, मॅच कधी? पाहा पलटणचं संपूर्ण वेळापत्रक
Mumbai Indians : पहिल्याच सामन्यात मुंबईपुढे आरसीबीचं आव्हान, मॅच कधी? पाहा पलटणचं संपूर्ण वेळापत्रकImage Credit source: TV9 Network/File
| Updated on: Nov 29, 2025 | 4:38 PM
Share

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेसाठी पाचही संघांनी कंबर कसली आहे. चौथ्या पर्वात जेतेपदाचा मान मिळवण्यासाठी पाचही संघ मैदानात उतरणार आहेत. आतापर्यंत झालेल्या तीन पर्वात मुंबई इंडियन्सचं पारडं जड दिसून आलं आहे. दोन वेळा जेतेपदाचा मान मिळवला आहे. तर एकदा आरसीबीने जेतेपदावर नाव कोरलं आहे. नुकतंच वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेसाठी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडली आणि पाचही संघ ठरले आहे. आता 9 जानेवारीपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आता या स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं आहे. 28 दिवसात एकूण 22 सामने खेळले जातील. दोन डबलहेडर्स सामने वगळता इतर सर्व सामने संध्याकाळी 7 वाजता सुरु होतील. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर प्राथमिक फेरी आणि पहिले दोन डबलहेडर्स खेळवले जातील, त्यानंतर स्पर्धेचा दुसरा भाग वडोदरा येथे खेळवला जाईल.

मुंबई इंडियन्स संपूर्ण वेळापत्रक

  • 9 जानेवारी – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू , नवी मुंबई
  • 10 जानेवारी – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, नवी मुंबई
  • 13 जानेवारी – मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स, नवी मुंबई
  • 15 जानेवारी – मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, नवी मुंबई
  • 17 जानेवारी – यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, नवी मुंबई
  • 20 जानेवारी – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वडोदरा
  • 26 जानेवारी – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, वडोदरा
  • 30 जानेवारी – गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वडोदरा

नवी मुंबईत साखळी फेरीतील अंतिम सामना 17 जानेवारी रोजी दिल्ली आणि आरसीबी यांच्यात खेळला जाईल. 18 जानेवारी रोजी विश्रांतीचा दिवस असेल. त्यानंतर वडोदरामध्ये एकूण 11 सामने खेळले जातील. पाच संघांच्या या लीगमध्ये, प्रत्येकी आठ सामने खेळतील. साखळी फेरीत टॉपला असलेल्या संघाला अंतिम फेरीत थेट खेळण्याची संधी मिळेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेला संघ एलिमिनेटर सामना खेळेल. एलिमिनेटर सामना 3 फेब्रुवारी रोजी मंगळवारी आणि अंतिम सामना 5 फेब्रुवारी गुरुवारी होणार आहे.

मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), नॅट सायव्हर-ब्रँट, अमेलिया केर, राहिल फिरदौस, पूनम खेमनार, त्रिवेणी वशिष्ठ, नल्ला रेड्डी, साइका इशाक आणि मिली इलिंगवर्थ, हॅली मॅथ्यूज, अमनजोत कौर, सजीवन सजना, शबनीम इस्माइल, गुनालन कुलकर्णी, निकोला कॅरी, संस्कृती गुप्ता.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.