WTC 2023 Final 2nd day : दुसऱ्या दिवशीच भारतीय संघ अडचणीत, ऑस्ट्रेलियाच्या मजबूत स्थितीमुळे फॉलोऑनचा धोका

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या महत्त्वपूर्ण सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. आघाडीचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. अजूनही ऑस्ट्रेलियाकडे 318 धावांची आघाडी आहे.

WTC 2023 Final 2nd day : दुसऱ्या दिवशीच भारतीय संघ अडचणीत, ऑस्ट्रेलियाच्या मजबूत स्थितीमुळे फॉलोऑनचा धोका
WTC 2023 Final : रहाणे टीम इंडियाला तारणार का? ऑस्ट्रेलियाकडे 318 धावांची आघाडीImage Credit source: ICC
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 11:19 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशी क्रीडाप्रेमींना अपेक्षा होती. मात्र सुपरस्टार बॅट्समनची फलंदाजी पाहून भ्रमनिरास झाला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 10 गडी गमवून 469 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना आघाडीच्या फलंदाजांनी रांग लावली. मैदानात हजेरी लावून खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतत होते. त्यामुळे क्रीडारसिकांनी सोशल मीडियावर अक्षरश: वाभाडे काढले. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणारे सुपरस्टार आयसीसी स्पर्धेत नांगी टाकत असल्याने टीका नेटकऱ्यांनी केली. भारताने 5 गडी बाद 151 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडे अजूनही 318 धावांची आघाडी आहे.

दुसऱ्या दिवसात भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 3 गडी बाद 327 धावा केल्या होत्या. मात्र भारतीय गोलंदाजांनी कमबॅक करत दुसऱ्या दिवशी 142 धावा देत 7 गडी बाद केले. त्यानंतर भारतीय फलंदाजांकडून खूपच अपेक्षा होत्या. मात्र संघाची धावसंख्या 30 असताना रोहित शर्मा बाद होऊन तंबूत परतला. त्याने 26 चेंडूत 15 धावा केल्या.

रोहित शर्मा तंबूत परतत नाही तोच शुभमन गिल 13 धावांवर क्लिन बोल्ड झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजाराकडून अपेक्षा असताना त्यानेही नांगी टाकली. 14 धावा करून ग्रीनच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. त्यानंतर विराट कोहली काही करेल अशी अपेक्षा होती मात्र तोही काही खास करू शकला नाही. 14 धावांवर विकेट देऊन आला.

संघावर दबाव असताना रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे या जोडीने डाव सावरला. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी अर्धशतकी खेळी केली. मात्र नाथन लायने फिरकीच्या जाळ्यात जडेजाला अडकवला आणि तंबूत पाठवलं. जडेजाने 51 चेंडूत 48 धावा केल्या. दुसरीकडे अजिंक्य रहाणे एकहाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्या दिवसअखेर अजिंक्य रहाणे नाबाद 29 आणि श्रीकर भरत नाबाद 5 धावांवर खेळत आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.