Rohit Sharma: हुकूम सर आँखो पर, रोहीत शर्माच्या त्या प्रसंगावर चहलचं पहिल्यांदाच उत्तर

ही जोडी फोडण्यासाठी रोहितने ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजीसाठी आणलं. त्यावेळी फिल्ड प्लेसमेंट करत असताना रोहित युजवेंद्र चहलवर चिडला.

Rohit Sharma: हुकूम सर आँखो पर, रोहीत शर्माच्या त्या प्रसंगावर चहलचं पहिल्यांदाच उत्तर
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 7:25 PM

अहमदाबाद: वेस्ट इंडिज विरुद्ध भारताने (India vs West indies) दुसरा वनडे सामना जिंकला असला, तरी मैदानावर घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करताना काल कॅप्टन रोहित शर्मा (Rohit sharma) युजवेंद्र चहलवर (Yuzvendra chahal) ओरडला. ही फार मोठी गंभीर बाब नाहीय. पण व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. रोहित युजवेंद्र चहलवर चिडला, ते स्टंम्पसमधल्या मायक्रोफोनमुळे सर्वांना समजलं. कोरोनामुळे स्टेडियमवर प्रेक्षकांना परवानगी नाहीय. सध्या कोरोनामुळे स्टेडियम्सवर प्रेक्षकांना परवानगी नाहीय. त्यामुळे स्टंम्पसमधल्या मायक्रोफोनमुळे मैदानावर खेळाडूंमध्ये होणारा संवाद प्रेक्षकांना कळतो. वेस्ट इंडिजची ओडियन स्मिथ आणि अलझारी जोसेफची नवव्या विकेटसाठी जमलेली जोडी थोडी त्रासदायक ठरत होती. ही जोडी फोडण्यासाठी रोहितने ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजीसाठी आणलं. त्यावेळी फिल्ड प्लेसमेंट करताना रोहित युजवेंद्र चहलवर चिडला.

नेमकं काय झालं? स्मिथ-जोसेफची जोडी फोडण्यासाठी रोहित क्षेत्ररक्षण लावत होता. त्यावेळी चहल, अपेक्षित वेगाने मैदानात हालचाल करत नव्हता, त्यामुळे रोहित चिडला. “मागे जा, काय झालं तुला? का नीट पळत नाहीयस? चल तिथे पळ” रोहितचे हे शब्द स्टंम्पसवरच्या मायक्रोफोनमुळे सर्वांनी ऐकले. त्यावेळी रोहित चिडलेला दिसत होता.

युजवेंद्रने दिलं उत्तर या व्हिडिओवर आता युजवेंद्र चहलने उत्तर दिलं आहे. ‘कप्तान का हुक्म सर आंखों पर’ असं युजवेंद्रने म्हटलं आहे. रोहित शर्मा आणि युजवेंद्र चहल चांगले मित्र आहेत. मैदानावर दोघे अनेकदा मस्ती करताना दिसतात. युजवेंद्रने पहिल्या वनडेमध्ये चांगली गोलंदाजी करुन चार विकेट काढल्या होत्या. चहलने त्याचे श्रेय कॅप्टन रोहित शर्माला दिलं होतं.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.