AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Keshav Maharaj : हनुमान भक्त केशव महाराजचं ऐतिहासिक ‘द्विशतक’, दक्षिण आफ्रिकेसाठी अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

Keshav Maharaj Record : हनुमान भक्त असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराज याने झिंबाब्वे विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इतिहास घडवला आहे. केशव दक्षिण आफ्रिकेसाठी अशी कामगिरी करणारा पहिला फिरकीपटू ठरला आहे.

Keshav Maharaj : हनुमान भक्त केशव महाराजचं ऐतिहासिक 'द्विशतक', दक्षिण आफ्रिकेसाठी अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
Keshav Maharaj South AfricaImage Credit source: Sydney Seshibedi/Gallo Images/Getty Images
| Updated on: Jun 29, 2025 | 7:36 PM
Share

दक्षिण आफ्रिकेने काही दिवसांपूर्वी लंडनमधील लॉर्डसमध्ये ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या ट्रॉफीवर नाव कोरलं. दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. दक्षिण आफ्रिका त्यानंतर आता झिंबाब्वे दौऱ्यावर आहे. झिंबाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेत 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

उभयसंघातील पहिला सामना हा क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करत असलेला हनुमान भक्त स्पिनर केशव महाराज याने इतिहास घडवला आहे. केशव महाराज दक्षिण आफ्रिकेसाठी अशी कामगिरी करणारा पहिला फिरकीपटू ठरला आहे.

केशव महाराज याने झिंबाब्वेच्या पहिल्या डावात कर्णधार क्रेग एर्व्हिन याला आऊट करत महारेकॉर्ड केला आहे. केशवने या विकेटसह अविस्मरणीय अशी कामगिरी केली आहे. केशवने विकेट्सचं द्विशतक अर्थात 200 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या आहेत. केशव यासह 200 विकेट्स घेणारा पहिला फिरकीपटू ठरला आहे. तर दक्षिण आफ्रिकेसाठी याआधी 8 वेगवान गोलंदाजांनी 200 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

हनुमान भक्त केशव महाराज

केशव महाराज मुळ भारतीय आहे. मात्र तो दक्षिण आफ्रिकेसाठी खेळतो. केशव हनुमान भक्त आहे. केशवचं कुटुंबिय मुळचे उत्तर प्रदेशमधील सुल्तानपूरचे आहेत. मात्र अनेक वर्षांपूर्वी केशवचे कुटुंबिय डरबनला गेले. केशवचा जन्म तिथेच झाला. त्यामुळे केशव दक्षिण आफ्रिकेसाठी खेळतो. केशवला या सामन्यात नियमित कर्णधार टेम्बा बावुमा याला झालेल्या दुखापतीमुळे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. टेम्बाला डब्ल्यूटीसी फायनल दरम्यान दुखापत झाली होती.

केशव महाराजच्या 200 विकेट्स पूर्ण

पहिल्या सामन्यात काय झालं?

दरम्यान दक्षिण आफ्रिकेने पहिला डाव हा 9 बाद 418 धावांवर घोषित केला. दक्षिण आफ्रिकेसाठी लुहान ड्री प्रिटोरीयस याने सर्वाधिक 153 धावा केल्या. कॉर्बिन बॉश याने नाबाद शतकी खेळी केली. तर इतरांनी दिलेल्या योगदानामुळे दक्षिण आफ्रिकेला 400 पार मजल मारता आली. मात्र प्रत्युत्तरात झिंबाब्वेने 217 धावांवर सातवी विकेट गमावली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला मोठी आघाडी मिळण्याची शक्यता आहे. आता झिंब्बावे ही आघाडी मोडीत काढते का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.