झिंबाब्वेच्या विकेटकीपरची ऐतिहासिक कामगिरी, आता सचिन-जयसूर्याच्या रेकॉर्डवर डोळा
ZIM vs SL 1st Odi : ब्रँडन टेलर याने अनेक वर्षांनंतर झिंबाब्वे संघात पुनरागमन केलं. यासह ब्रँडनने इतिहास घडवला आहे. ब्रँडन वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक काळ खेळणारा तिसरा खेळाडू ठरला आहे.

झिंबाब्वेचा रंगतदार झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरुद्ध अवघ्या 7 धावांनी पराभव झाला. श्रीलंकेने झिंबाव्वेसमोर 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं. झिंबाब्वेने या सामन्यात शेवटपर्यंत लढत दिली. झिंबाब्वेला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 10 धावांची गरज होती. मात्र दिलशान मधुशंका याने 50 व्या ओव्हरमधील पहिल्या 3 बॉलमध्ये सलग 3 विकेट्स घेत हॅटट्रिक पूर्ण केली. दिलशानने शेवटच्या ओव्हरमध्ये अवघ्या 2 धावा दिल्या आणि श्रीलंकेला विजयी केलं. श्रीलंकेने झिंबाब्वेचा तोंडातील विजयाचा घास हिसकावला. मात्र या सामन्यात झिंबाब्वेचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज ब्रँडन टेलर याने इतिहास घडवला. ब्रँडनने काही वर्षांच्या बंदीच्या कारवाईनंतर संघात कमबॅक केलं. ब्रँडनने या कमबॅकसह मोठी कामगिरी केली.
ब्रँडनने आयसीसीच्या निलंबनाच्या कारवाईनंतर पुनरागमन केलं. ब्रँडनने यासह मोठा विक्रम केला. ब्रँडन यासह सर्वाधिक वर्ष एकदिवसीय क्रिकेट खेळणारा तिसरा फलंदाज ठरला. ब्रँडनपुढे आता फक्त सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेचा माजी फलंदाज सनथ जयसूर्या हे दोघेच आहेत.
आयसीसीने टेलरवर साडे तीन वर्षांची बंदी घातली होती. टेलर या बंदीनंतर संघात परतला. टेलरने ऑगस्ट महिन्यात न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेत खेळला. टेलरची यासह 21 व्या शतकात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वात मोठी कसोटी कारकीर्द ठरली.
टेलर श्रीलंकेविरुद्ध 29 ऑगस्टला एकदिवसीय सामना खेळला. टेलरचा हा गेल्या 4 वर्षांतील पहिला एकदिवसीय सामना ठरला. टेलरची यासह सर्वात मोठी एकदिवसीय क्रिकेट कारकीर्द ठरली. टेलर जानेवारी 2001 नंतर एकदिवसीय पदार्पण करणारा पहिला सक्रीय फलंदाज ठरला.
टेलरने 20 एप्रिल 2004 रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय पदार्पण केलं. टेलरने या शतकात पदार्पण करणाऱ्या आणि सर्वात मोठी कारकीर्द असणाऱ्या खेळाडूंमध्ये झिंबाब्वेच्या सीन विलियम्स याला मागे टाकलं आहे. सीन विलियम्स याची एकदिवसीय कारकीर्द ही 19 वर्ष 300 दिवसांची राहिली. तर टेलरने पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियाँदाद यालाही मागे टाकलं. मियादादची कारकीर्द 20 वर्ष 272 दिवसांची होती.
सचिनची एकदिवसीय कारकीर्द ही 22 वर्ष 91 दिवसांची ठरली. तर सनथ जयसूर्या 21 वर्ष 184 दिवस वनडे क्रिकेट खेळला. तर या यादीत आता ब्रँडन टेलर याची एन्ट्री झाली आहे. तसेच 1989 नंतर पदार्पण करणाऱ्या खेळाडूंपैकी सचिन सर्वाधिक वेळ कसोटी क्रिकेट खेळणारा खेळाडू ठरला. सचिनने 24 वर्ष आणि 1 दिवस कसोटी क्रिकेटची सेवा केली.
