विश्वचषकानंतर ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूंचा क्रिकेटला अलविदा

सगळ्यात कठीण आणि आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या यंदाच्या क्रिकेट विश्वचषकाचा थरार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या इंग्लंडमध्ये यंदाचा विश्वचषक रंगत आहे.

विश्वचषकानंतर 'या' दिग्गज क्रिकेटपटूंचा क्रिकेटला अलविदा

मुंबई : सगळ्यात कठीण आणि आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या यंदाच्या क्रिकेट विश्वचषकाचा थरार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या इंग्लंडमध्ये यंदाचा विश्वचषक रंगत आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान, पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश, श्रीलंका विरुद्ध वेस्टइंडिज असे हायव्होल्टेज सामने विश्वचषकात पाहायला मिळाले. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेनंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी एकदिवसीय क्रिकेटला कायमचे गुडबाय केले. तर काही क्रिकेटपटू लवकरच निवृत्ती घेणार असल्याचे बोललं जात आहे.

अंबाती रायुडू

विश्वचषक स्पर्धा सुरु असताना अचानक 3 जुलैला भारताचा स्टार फलंदाज अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याबाबतच लेखी पत्र त्याने बीसीसीआयला दिले. टीम इंडियात निवड न झाल्याने नाराज अंबाती रायुडूने धक्कादायकरित्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अंबाती रायडू हा 33 वर्षाचा असून त्याने भारताकडून 55 वन डे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 1 हजार 694 धावा केल्या असून, 3 शतकं आणि 10 अर्धशतकं झळकावली आहेत.

ख्रिस गेल

चौकार षटकारांचा बादशहा अशी ओळख असणाऱ्या वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेलने निवृत्ती जाहीर केली. वेस्ट इंडिज विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आल्यानंतर ख्रिस गेलने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केलं. गेलने यंदाच्या विश्वचषकात शेवटचा एकदिवसीय सामना अफगाणिस्तानसोबत खेळला. ख्रिस गेल हा ३९ वर्षाचा असून त्याने वेस्ट इंडिजकडून 297 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 10 हजार 393 धावा केल्या असून, 1 द्विशतक, 25 शतकं आणि 50 अर्धशतकं झळकावली आहेत.

मशरफी मुर्तझा

बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज मशरफी मुर्तझा यानेही यंदाच्या विश्वचषकानंतर निवृत्तीची घोषणा केली. मुर्तझाने 217 एकदिवसीय सामन्यात 266 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना पाकिस्तान विरुद्ध खेळला होता.

शोएब मलिक

पाकिस्तानचा सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडू अशी ओळख असणाऱ्या शोएब मलिकने कसोटीनंतर आता एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये शोएबने 287 सामन्यांत 9 शतकं आणि 44 अर्धशतकांच्या जोरावर 7 हजार 534 धावा  केल्या. यात 143 या  त्याच्या वैयक्तित सर्वोच्च धावा आहेत.  विश्वचषकात शेवटचा सामना शोएब मलिक भारताविरुद्ध खेळला आणि तोच त्याचा अखेरचा सामना ठरला.

लसिथ मलिंगा

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने यंदाच्या विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकानंतर तो टी-20 तूनही निवृत्ती घेणार आहे. त्याने आतापर्यंत 225 एकदिवसीय सामने खेळले आहे. त्यात त्याने 335 विकेट्स घेतले आहेत.

इम्रान ताहिर

आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज  इम्रान ताहिर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पाकिस्तानमध्ये जन्म झालेल्या इम्रानने 107 सामने खेळले आहेत. जगातील सर्वोत्तम फिरकीपटू म्हणून इम्रानची ओळख आहे. तहिरने आतापर्यंत 107 सामन्यात 173 विकेट्स घेतल्या आहेत. तहिरने आपला शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता.

जे पी ड्युमनी

आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज  इम्रान ताहिरनंतर जे. पी. ड्युमनी यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. ताहिरप्रमाणे ड्युमनीने 199 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने 69 विकेट्स घेतले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI