AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : मुंबईच्या विजयानंतर धोनीचा 6 वर्षांचा चाहता संतापला, घरात किंचाळून राडा

मुंबई : मुंबई इंडियन्सने (MI) आयपीएलच्या थरारक फायनलमध्ये शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अवघ्या 1 धावाने पराभव केला. लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर CSK च्या शार्दूल ठाकूरची विकेट घेत मुंबईला चौथ्यांदा आयपीएलचा चषक मिळवून दिला. या विजयानंतर मुंबईतील क्रिकेट चाहत्यांनी रस्त्यावर येत सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली. मात्र यामुळे CSK च्या फॅन्सचा मात्र चांगलाच हिरमोड झाला. […]

VIDEO : मुंबईच्या विजयानंतर धोनीचा 6 वर्षांचा चाहता संतापला, घरात किंचाळून राडा
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM
Share

मुंबई : मुंबई इंडियन्सने (MI) आयपीएलच्या थरारक फायनलमध्ये शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अवघ्या 1 धावाने पराभव केला. लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर CSK च्या शार्दूल ठाकूरची विकेट घेत मुंबईला चौथ्यांदा आयपीएलचा चषक मिळवून दिला. या विजयानंतर मुंबईतील क्रिकेट चाहत्यांनी रस्त्यावर येत सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली. मात्र यामुळे CSK च्या फॅन्सचा मात्र चांगलाच हिरमोड झाला. मुंबईच्या विजयानंतर CSK च्या 6 वर्षांच्या एका चाहता चांगलाच संतापला. चेन्नईचा पराभव झाल्याने त्याने मॅच संपल्यानंतर रडून रडून घरात एकच धिंगाणा घातला. सध्या सोशल मीडियावर हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हीडिओमध्ये एक लहान मुलगा घरात आपल्या आईसोबत बसला आहे. यात मुंबई जिंकल्याचं त्याला समल्यावर त्यांनी घरात जोरजोरात किंचाळायला सुरुवात केली. घरात जोरजोरत किंचाळत असल्यानं त्याच्या आईने त्याला फटकारलं. मात्र तिचं काहीही न ऐकता त्यांनी अजून जोरात रडायला सुरुवात केली. यावेळी मुलाला शांत करण्यासाठी ”आपण मुंबईत राहतो, मग मुंबई जिंकली तर चांगलंच आहे ना…”असे सांगितले. मात्र या मुलाने आईचे काहीही ऐकले नाही. ट्विटरवर एका युजर्सने हा व्हीडिओ टाकला आहे. विशेष म्हणजे या व्हीडिओवर त्या युजर्सने धोनीलाही टॅग केलं आहे.

आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने 8 विकेट गमावत चेन्नई सुपर किंग्जला 150 धावांचे लक्ष्य दिलं. या धावांचा सुरुवातीपासूनच चेन्नईने चांगला सामना केला. यात एकट्या शेन वॉटसनने 8 चौकार आणि 4 षटकारांच्या सहाय्याने 80 धावांचा डोंगर रचला. त्यापाठोपाठ एक षटकार आणि तीन चौकारच्या मदतीने पफ ड्यु प्लेसिस 26 धावा केल्या. चेन्नईच्या टीममधील हे दोन खेळाडू वगळता इतर सर्व खेळाडू मात्र लवकर तंबूत परतले.

शेन वॉटसनच्या दमदार खेळीमुळे काही सेकंदासाठीसाठी मुंबईच्या फॅन्सच्या छातीत धडधड वाढली. यानंतर शेवटच्या चेंडूवर फिरकीपटू लसिथ मलिंगाने CSK च्या शार्दूल ठाकूरची विकेट घेतली आणि मुंबई आयपीएलच्या विजयाची मानकरी ठरली. यानंतर मुंबई इंडियन्सने फॅन्सने फटाके फोडत जल्लोष करण्यास सुरुवात केली.

यामुळे चेन्नईच्या हजारो चाहत्यांचा मात्र हिरमोड झाला. मुंबईच्या अनेकांनी चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांची टिंगल उडवण्यास सुरुवात केली. यानंतर सोशल मीडियावरही मुंबईच्या चाहत्यांचा जल्लोष पाहायला मिळाला.

पाहा व्हीडिओ :

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.