India vs Australia 2020 | वॉर्नर संघाबाहेर राहिला तर टीम इंडियासाठी फायदेशीरच, ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या दुखापतीवर केएलची प्रतिक्रिया

वॉर्नर दुखापतीमुळे एकदिवसीय आणि टी 20 मालिकेला मुकणार आहे.

India vs Australia 2020 | वॉर्नर संघाबाहेर राहिला तर टीम इंडियासाठी फायदेशीरच, ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या दुखापतीवर केएलची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 12:21 PM

सिडनी : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा 51 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 च्या फरकाने आघाडी घेतली. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरला  (David Warner)  दुखापत झाली. या दुखापतीमुळे वॉर्नरला तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला आणि टी 20 मालिकेला मुकावे लागणार आहे. ” वॉर्नरची दुखापत किती गंभीर आहे, हे आम्हाला माहिती नाही. पण वॉर्नर संघाबाहेर राहिला तर ते टीम इंडियासाठी फायदेशीर ठरेल, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुलने (K L Rahul)  वॉर्नरच्या दुखापतीवर दिली . David Warner stays out of the team due to injury it will be beneficial for Team India said KL Rahul

केएल काय म्हणाला?

“वॉर्नर दुखापतीतून सावरु नये, असं मी चिंतित नाही. पण वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज आहे. त्यामुळे वॉर्नरला जर दुखापतीतून सावरण्यास अधिक वेळ लागला, तर ते टीम इंडियासाठी फायदेशीर असेल”, अशी प्रतिक्रिया केएलने दिली.

टीम इंडियाविरोधातील दुसऱ्या सामन्यादरम्यान वॉर्नरला ही दुखापत झाली. फिल्डिंदरम्यान चेंडू अडवण्यासाठी वॉर्नरने ही डाईव्ह मारली होती. यादरम्यान वॉर्नरला ही दुखापत झाली. यानंतर वॉर्नरची आरोग्य तपासणी करण्यात आली. या दुखापतीमुळे वॉर्नरला मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय आणि टी 20 मालिकेला मुकावे लागणार आहे. वॉर्नरच्या जागी संघात डार्सी शॉर्ट (D’arcy Short) याला संघात स्थान देण्यात आले आहे. डार्सी एकदिवसीय आणि टी-20 मध्ये संघाचं प्रतिनिधित्व करेल.

वॉर्नरने टीम इंडियाविरोधातील पहिल्या दोन सामन्यात अर्धशतकी खेळी केली. वॉर्नरने पहिल्या सामन्यात 69 तर दुसऱ्या सामन्यात शानदार 83 धावा केल्या.

तिसरा आणि शेवटचा सामना 2 डिसेंबरला

या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 2 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्न असणार आहे. या एकदिवसीय मालिकेनंतर 3 टी 20 सामन्यांची आणि 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

IND vs AUS : कांगारुंना दुहेरी झटका, दोन दिग्गज खेळाडू एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतून बाहेर

India vs Australia 2020 | 24 डावात 7 अर्धशतकं, 839 धावा, मात्र शतकी खेळी करण्यास विराट कोहली अपयशी

David Warner stays out of the team due to injury it will be beneficial for Team India said KL Rahul

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.