Кagiso Rabada Purple Cap | 17 मॅचमध्ये 30 विकेट्स, पर्पल कॅप दिल्लीच्या कागिसो रबाडाकडे!

या स्पर्धेत दिल्लीच्या कागिसो रबाडाने यंदाच्या हंगामातील पर्पल कॅप मिळवली आहे. 17 मॅचमध्ये 30 विकेट्स त्याने मिळवल्या आहेत.

Кagiso Rabada Purple Cap | 17 मॅचमध्ये 30 विकेट्स, पर्पल कॅप दिल्लीच्या कागिसो रबाडाकडे!
दिल्लीचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने पुन्हा एकदा पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. हैदराबादविरुद्धच्या क्वालिफायर 2 सामन्यात कगिसोने एकूण 4 विकेट्स घेतल्या. यासह त्याने पर्पल कॅप मिळवली आहे. कगिसोने आयपीएलच्या या मोसमातील 14 सामन्यात एकूण 29 विकेट्स घेतल्या आहेत. तर जसप्रीत बुमराहने 27 विकेट्स घेतल्या आहेत. तर पर्पल कॅपच्या शर्यतीत ट्रेन्ट बोल्ट तिसऱ्या क्रमांकावर आहे. बोल्टने या मोसमात एकूण 22 विकेट्स घेतल्या आहेत.
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 12:37 AM

मुंबई :  टी-ट्वेन्टी क्रिकेट म्हटलं की फलंदाजांचा दबदबा असतो हे गृहीतक मानलं जातं. खोऱ्याने धावा काढल्या जातात. फलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं जातं. परंतु अशाही परिस्थितीत काही गोलंदाज प्रतिस्पर्धी टीमचं कंबरडं मोडण्यात निष्णात असतात. फलंदाजांना आक्रमक फटके खेळू न देण्यात माहीर असतात. या स्पर्धेत दिल्लीच्या कागिसो रबाडाने यंदाच्या हंगामातील पर्पल कॅप मिळवली आहे. 17 मॅचमध्ये 30 विकेट्स त्याने मिळवल्या आहेत. (Delhi Capital kagiso Rabada purple Cap)

यंदाच्या मोसमात कागिसो रबाडाने आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. सुरुवातीपासूनच त्याने मॅचविनिंग बोलिंग करत आपल्या संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिले. त्याचाच परिणाम म्हणजे सुरुवातीच्या काही मॅचमध्ये दिल्लीचा संघ गुणतालिकेत अव्व्ल स्थानी होता.

आजच्या अंतिम सामन्यात रबाडाला एकच विकेस मिळाली. 3 ओव्हरमध्ये 32 रन्स देत एका फलंदाजाला त्याने माघारी धाडलं. अंतिम सामन्यात स्कोअर कमी असताना दिल्लीच्या पाठीराख्यांना त्याच्याकडून चमत्काराची अपेक्षा होता. मात्र मुंबईच्या बॅट्समनने आक्रमक खेळी करत दिल्लीचा 5 गडी राखून पराभव केला. कागिसो रबाडाच्या पाठोपाठ मुंबईच्या बुमराहने 27 विकेट्स मिळवल्या तर ट्रेन्ट बोल्टने 25 विकेट्स मिळवल्या.

आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात कोणकोणत्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत पर्पल कॅप आपल्या नावावर केलीये हे आपण पाहूया.

आयपीएल 2008– राजस्थानकडून खेळताना पाकिस्तानच्या सोहेल तन्वीरने 11 मॅचमध्ये 22 विकेट्स मिळवल्या.

आयपीएल 2009– डेक्कन चार्जस हैदराबादकडून खेळताना भारताच्या आर.पी. सिंगने 16 मॅचमध्ये 23 विकेट्स काढल्या.

आयपीएल 2010-  डेक्कन चार्जस हैदराबादकडून खेळताना भारताच्या प्रग्यान ओझाने 16 मॅचमध्ये 21 विकेट्स काढल्या.

आयपीएल 2011– मुंबई इंडियन्सकडून खेळताना श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने 16 मॅचमध्ये 28 विकेट्स मिळवल्या.

आयपीएल 2012– दिल्ली डेअरडेवियल्सकडून खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या मॉर्ने मॉर्केलने 16 मॅचमध्ये 25 विकेट्स मिळवल्या.

आयपीएल 2013– आयपीएलमध्ये आतापर्यंत एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम ड्वेन ब्राव्होच्या नावावर आहे. ब्राव्होने चेन्नईकडून खेळताना 2013 मध्ये ही कामगिरी केली होती.

आयपीएल 2014– चेन्नईकडून खेळताना भारताच्या मोहित शर्माने 16 मॅचमध्ये 23 बळी टिपले.

आयपीएल 2015– चेन्नईकडून खेळताना वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होने 16 मॅचमध्ये 26 विकेट्स मिळवल्या.

आयपीएल 2016– हैदराबादकडून खेळताना भारताच्या भुवनेश्वर कुमारने 17 मॅचमध्ये 23 फलंदाजांना माघारी धाडलं.

आयपीएल 2017– सलग दोन वेळा भुवनेश्वर कुमारने पर्पल कॅफ मिळवली. 2016 नंतर लागोपाठ 2017 मध्ये देखील त्याने पर्पल कॅप आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं. या हंगामात त्याने  14 मॅचमध्ये 26 विकेट्स मिळवल्या.

आयपीएल 2018– किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना ऑस्ट्रेलियाच्या अँड्र्यू टायने 14 मॅचमध्ये 24 विकेट्स काढल्या.

आयपीएल 2019– चेन्नईकडून खेळणाऱ्या इम्रान ताहीरने 17 मॅचमध्ये 26 विकेट्स मिळवून पर्पल कॅपवर दावा केला.

आयपीएल 2020– दिल्लीचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. 17 मॅचमध्ये 30विकेट्स त्याने मिळवल्या आहेत.

(Delhi Capital kagiso Rabada purple Cap)

संबंधित बातम्या

PHOTO | जसप्रीत बुमराहला पछाडत कगिसो रबाडाचा पर्पल कॅपवर कब्जा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.