गौतम गंभीरवर अटकेची टांगती तलवार, वॉरंट जारी

नवी दिल्ली : नुकताच टीम इंडियातून निवृत्त झालेला फलंदाज गौतम गंभीरला दिल्लीतील कोर्टाने दणका दिलाय. आदेश देऊनही कोर्टात हजर न झाल्याप्रकरणी त्याच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. गौतम गंभीर रुद्रा बिल्डवेल या कंपनीचा ब्रँड अम्बेसेडर होता. या कंपनीने लोकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी मालकांसह गंभीरवरही खटला सुरु आहे. कंपनीच्या मालकांवर फसवणुकीसह इतर गुन्हे दाखल …

गौतम गंभीरवर अटकेची टांगती तलवार, वॉरंट जारी

नवी दिल्ली : नुकताच टीम इंडियातून निवृत्त झालेला फलंदाज गौतम गंभीरला दिल्लीतील कोर्टाने दणका दिलाय. आदेश देऊनही कोर्टात हजर न झाल्याप्रकरणी त्याच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. गौतम गंभीर रुद्रा बिल्डवेल या कंपनीचा ब्रँड अम्बेसेडर होता. या कंपनीने लोकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी मालकांसह गंभीरवरही खटला सुरु आहे.

कंपनीच्या मालकांवर फसवणुकीसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रुद्रा ग्रुपकडून गौतम गंभीरला ब्रँड अम्बेसेडर म्हणून निवडण्यात आलं होतं. कोर्टाने नुकतीच गंभीरची पुनर्विचार याचिकाही फेटाळली होती. आपण फक्त ब्रँड अम्बेसेडर असून या फसवणुकीशी काहीही संबंध नसल्याचं गंभीरने म्हटलं होतं. वाचा – भावूक पोस्ट लिहून गंभीरचा सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा

कोर्टाने गंभीरची ही याचिका फेटाळली होती आणि यावेळी आता वॉरंट जारी केला आहे. याचिका फेटाळल्यानंतरही कोर्टात हजर न राहिल्यामुळे कोर्टाने हा वॉरंट जारी केला. रिअल इस्टेट नियमाक प्राधिकरणानेही रुद्रा ग्रुपला डिफॉल्टरमध्ये टाकलं आहे. वाचा – गौतम गंभीर… श्रेयापासून कायम वंचित राहिलेला ‘रियल हिरो’

गंभीरने नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. गौतम गंभीरने 58 कसोटी सामने, 147 वन डे आणि 37 टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो भारतीय वन डे संघातून बाहेर होता. नुकतंच त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आगामी आयपीएल मोसमासाठी रिलीज करण्यात आलं होतं.

गंभीरची कारकीर्द

गंभीरने भारतासाठी अखेरचा कसोटी सामना राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध 2016 मध्ये खेळला होता. 58 कसोटी सामन्यांच्या त्याच्या नावावर 4154, वन डेमध्ये 5238 आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याच्या खात्यात 932 धावा जमा आहेत. गंभीरने  2003 साली ढाक्यात खेळवण्यात आलेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 15041 धावा आहेत, तर अ श्रेणी क्रिकेटमध्येही त्याने 10777 धावा केल्या आहेत. शिवाय कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलमध्ये दोन वेळा चॅम्पियन बनवण्यात त्याचा मोठा वाटा होता. त्याच्याच नेतृत्त्वात केकेआरने हा मान मिळवला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *