पलाश मुच्छल याच्या आरोग्याबाबत डॉक्टरांनी केला मोठा खुलासा, तब्येत बिघडण्याचे सांगितले थेट कारणच, स्मृती मानधना हिच्या…
Smriti Mandhana and Palash Muchhal : संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना हिच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे दिसतंय. ऐन लग्नाच्या दिवशी लग्न झाले नाही आणि पुढची तारीखही जाहीर केली नाही. हेच नाही तर यादरम्यानच होणाऱ्या नवऱ्याचे काही धक्कादायक चॅटिंगचे स्क्रीनशॉर्टही व्हायरल झाली. त्यामध्येच आता मोठी अपडेट आलीये.

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न 23 नोव्हेंबर रोजी सांगलीत होणार होते. लग्नाला अवघे काही तास शिल्लक असताना स्मृती मानधना हिच्या वडिलांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. संगीत, हळद जोरदार झाली. त्यानंतर मोठे वादळ स्मृती मानधना हिच्या आयुष्यात आले. वडिलांपाठोपाठ पलाश मुच्छल यालाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवस सांगलीतील रूग्णालयात पलाशवर उपचार केल्यानंतर त्याला आता मुंबईतील रूग्णालयात हलवण्यात आले. सुरूवातीला स्मृती मानधना वडिलांची तब्येत बिघडल्याने लग्न पुढे ढकलल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, यादरम्यानच पलाश याचे हैराण करणारे काही चॅटिंगचे स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली आणि एकच खळबळ उडाली.
स्मृती मानधना हिला पलाश आपल्याला धोका देत असल्याचे कळाल्यानेच तिने हे लग्न न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल स्क्रीनशॉर्टनंतर पलाश स्मृतीला धोका देत असल्याचा दावा करण्यात आला. त्यामध्येच आता पलाशवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याच्या तब्येतीबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला आहे. पलाशचे हेल्थ अपडेट देताना डॉक्टरांनी सांगितले की, तणावामुळे पलाशची तब्येत खराब झाली होती.
हेच नाही तर तीन आठवडे त्याला आराम करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, पलाश आणि स्मृती मानधना यांच्या लग्नाबाबत काहीच अपडेट मिळू शकली नाही. पलाश याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर दीप्रेंद त्रिपाठी यांनी म्हटले की, पलाशची कंडीशन सीरियस कार्डिएक तणावामुळे झाली. पलाशला सांगलीतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर सुरूवातीच्या लक्षणाच्या आधारीत उपचार करण्यात आले. मात्र, काही सुधार दिसले नसल्याने मुंबईत आणले गेले.
SRV हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्याच्या छातीमध्ये त्रास, घाबरल्यासारखे आणि श्वास घेण्यास त्याला समस्या येत होती. इसीजी आणि 2डी इकोसारख्या त्याच्या काही टेस्टही केल्या. हदयाशी संबंधत अशी कोणती मोठी समस्या दिसत नाहीये, त्याचे थोडे मार्कर वाढल्याचे दिसले. तब्येत सुधारल्याने पलाशला जनरल रूममध्ये शिफ्ट करण्यात आले. पलाशची तब्येत अधिक तणावामुळे बिघडली होती. आता त्याच्या तब्येतीत मोठी सुधारणा बघायला मिळतंय. हळूहळू तणाव कमी होत आहे. हेच नाही तर लवकरच त्याला रूग्णालयातून घरी सोडले जाईल. तीन आठवडे पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला त्याला डॉक्टरांनी दिला. हेच नाही तर अजिबात तणाव न घेण्यासही सांगितले आहे.
