टायगर अभी जिंदा है, 45 वर्षीय बॅट्समनचं वादळ, 15 चौकार-15 षटकार, इंझावाती 190 धावा

इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेटमध्ये केंटच्या डॅरेन स्टीव्हन्स या 45 वर्षीय बॅट्समनने आतिषी खेळी केलीय. केवळ 149 चेंडूत 15 फोर आणि 15 सिक्सर ठोकून त्याने 190 धावा ठोकल्या. (Darren Stevens 45 years kent Batsman Slamesh 15 Four 15 Six 190 Run)

टायगर अभी जिंदा है, 45 वर्षीय बॅट्समनचं वादळ, 15 चौकार-15 षटकार, इंझावाती 190 धावा
डॅरेन स्टीव्हन
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 2:35 PM

मुंबई : काही खेळाडूंना वयाचं बंधन नसतं. त्यांच्या अप्रतिम खेळाने ते फॅन्सच्या हृदयावर सतत अधिराज्य गाजवत असतात. इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेटमध्ये (county cricket) केंट संघाकडून खेळणाऱ्या डॅरेन स्टीव्हन्स (Darren Stevens) या 45 वर्षीय बॅट्समनने आतिषी खेळी केलीय. केवळ 149 चेंडूत 15 फोर आणि 15 सिक्सर ठोकून त्याने 190 धावा ठोकल्या. याचसोबत स्टीव्हन्सने खास विक्रम आपल्या नावे केलाय. आतापर्यंत 40 वर्षांवरील कोणत्याही फलंदाजाने 15 षटकार मारले नव्हते. त्याने ही अद्भुत कामगिरी वयाच्या 45 वर्षी करुन दाखवलीय. डॅरेन स्टीव्हन्सच्या वादळासमोर प्रतिस्पर्धी संघाने गुडघे टेकले. (England Darren Stevens 45 years kent Batsman Smashes 15 Four 15 Six 190 Runs)

डॅरेन स्टीव्हन्सच्या नावे खास विक्रम

40 वर्षांवरील कोणत्याही बॅट्समनने 10 सिक्सरहून अधिक सिक्सर मारले नव्हते. स्टीव्हन्सने 15 षटकार मारुन नाव विक्रम प्रस्थापित केलाय. याअगोदर हा विक्रम जॉन मॅकपीसच्या नावावर होता. जॉन मॅकपीसने 1926 मध्ये वॉन्सरशायरविरुद्धच्या सामन्यात लँकशायरकडून खेळताना गगगचुंबी 10 षटकार ठोकले होते. त्यावेळी मॅकपीस 44 वर्षांचे होते.

डॅरेन स्टीव्हन्सचा चमत्कार

केंटचा संघ डॅरेन स्टीव्हन्सच्या 190 धावांच्या खेळीच्या जोरावर 3०7 धावा करू शकला. केंटच्या 7 विकेट्स केवळ 92 धावांवर पडल्या होत्या. डॅरेनने कमिन्सला साथीला घेत 9 व्या विकेटसाठी 166 धावांची भागीदारी केली. या भागीदारीत कमिन्सने केवळ 1 धावा केली. उर्वरित धावा स्टीव्हन्सच्या बॅटमधून निघाल्या. उत्तुंग बॅटिंगनंतर स्टीव्हन्सने गोलंदाजीतही दम दाखवला. मार्कस लबुशेनेची महत्तवपूर्ण विकेटही त्याने मिळविली.

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील तारा

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील स्टीव्हन्सचं हे 36 वं शतक होते. स्टीव्हन्सने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत 315 सामने खेळले आहेत. शिवाय गोलंदाजीमध्ये देखील त्यांनी आपली पॉवर दाखवली आहे. 565 प्रथम श्रेणी विकेटही त्याने आपल्या नावावर केल्या आहेत. स्टीव्हन्सने 1997 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

(England Darren Stevens 45 years kent Batsman Smashes 15 Four 15 Six 190 Runs)

हे ही वाचा :

माँटी पनेसारची भविष्यवाणी, इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत ‘हा’ संघ 5-0 ने जिंकेल!

IPL स्थगित झाली नसती तर मीच स्पर्धा सोडली असती, चहलच्या तडकाफडकी निर्णयामागचं ‘इमोशनल’ कारण

बॅट्समन नवऱ्याची ऑलराऊंडर पत्नी, व्हॅलेंटाईनदिनी खास मुलाखत, ‘क्रिकेट प्रेम आणि बरंच काही’!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.