AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : इंग्लंडच्या कॅप्टनने वैभव सूर्यवंशीची दहशत उडवून लावली, त्याच्यात दम आहे मान्य, पण..

ENG vs IND 1st T20 : आजपासून इंग्लंड विरुद्ध पाच टी20 सामन्यांची सीरीज सुरु होत आहे. आयर्लंड विरुद्ध दोन टी20 सामन्यांच्या मालिकेत भारताचा दारुण पराभव झाला. आता इंग्लंड विरुद्ध मालिकेत तरी वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार का? याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.

ENG vs IND : इंग्लंडच्या कॅप्टनने वैभव सूर्यवंशीची दहशत उडवून लावली, त्याच्यात दम आहे मान्य, पण..
Vaibhav Sooryavanshi Image Credit source: PTI
| Updated on: Jul 01, 2026 | 8:09 AM
Share

सध्या क्रिकेट विश्वात वैभव सूर्यवंशीची चर्चा आहे. त्याच्या फलंदाजीची गोलंदाजांवर दहशत आहे. कारण पहिल्या चेंडूपासून वैभव सूर्यवंशी आक्रमक खेळतो. पण इंग्लंडचा व्हाइट बॉल कॅप्टन हॅरी ब्रूकने वैभव सूर्यवंशीला जास्त महत्व दिलं नाही. त्याने वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीची दहशत मान्य करण्यास नकार दिला. आजपासून भारत आणि इंग्लंडमध्ये T20 मालिकेला सुरुवात होणार आहे. डरहॅममध्ये पहिला सामना होणार आहे. आयर्लंड विरुद्ध दोन टी20 सामन्याच्या सीरीजमध्ये वैभव सूर्यवंशीचा डेब्यू होईल ही तमाम चाहत्यांची अपेक्षा फोल ठरली. आता इंग्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यात त्याला संधी मिळेल अशी आशा आहे. असं झाल्यास सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेला सर्वात युवा क्रिकेटर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचा रेकॉर्ड मोडीत निघेलं.

राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये दमदार प्रदर्शन केलं. 776 धावा फटकावल्या. या कामगिरीच्या बळावर त्याची आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या टी20 सीरीजसाठी टीममध्ये निवड झाली. पण आयर्लंड विरुद्ध त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. लिस्ट ए क्रिकेमध्ये श्रीलंका अ विरुद्ध वैभवने फायनलमध्ये 11 चेंडूत धडाकेबाद अर्धशतकी खेळी केली. आयर्लंड विरुद्ध भारतीय टीम मॅनेजमेंटने त्यांचे नियमित ओपनर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांच्यावरच विश्वास दाखवला. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला बेंचवर बसून रहावं लागलं.

इंग्लंडचा कॅप्टन वैभव सूर्यवंशीबद्दल काय बोलला?

भारताविरुद्ध पहिला T20 सामना खेळण्याआधी इंग्लंडचा कॅप्टन हॅरी ब्रूकने वैभव सूर्यवंशीचं कौतुक केलं. पण त्याने त्याच्या गोलंदाजांवर विश्वास दाखवला. ते ठरवलेल्या योजनेची अंमलबजावणी करतील असा ब्रुकला विश्वास आहे. “तो प्रतिभावान खेळाडू आहे. मागच्या दीड वर्षात त्याने खरच चांगली कामगिरी केली आहे. पण आम्ही रणनिती आखली आहे. ती यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे. भारताला सर्वोत्तम क्रिकेट खेळण्यापासून रोखण्यासाठी आम्ही पडद्याआड बरीच मेहनत केली आहे” असं हॅरी ब्रूक सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत म्हणाला.

श्रेयस अय्यरने काय संकेत दिलेत?

वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार की नाही, यावर भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने उत्तर देणं टाळलं. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हीच सलामीची जोडी कायम राहिल असे संकेत श्रेयसने दिले आहेत. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला अजून वाट पहावी लागेल असं दिसतय.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...