WTC Final : रोहित शर्माची जर बॅट चालली तर अंतिम सामन्यात दुहेरी शतक ठोकलंच म्हणून समजा…, पाकिस्तानच्या दिग्गजाची भविष्यवाणी

रोहित शर्मा मॅचविनिंग खेळाडू आहे. त्याच्याकडे मोठा डाव खेळण्याची क्षमता आणि प्रतिभा दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात जर त्याची बॅट चालली तर तो दुहेरी शकत ठोकेन, असं राजा म्हणाले. (Ramiz Raza on Rohit Sharma ICC World Test Championship Final 2021)

WTC Final : रोहित शर्माची जर बॅट चालली तर अंतिम सामन्यात दुहेरी शतक ठोकलंच म्हणून समजा..., पाकिस्तानच्या दिग्गजाची भविष्यवाणी
शेवटचं नाव येत सर्वांच्या लाडक्या हिटमॅनच. रोहित शर्माची कसोटी कारकीर्द एकदिवसीय कारकीर्दीऐवढी भारी नसली तरी त्याने जेव्हा शतक ठोकलंय, भारतीय संघ विजयी झालाय. त्याने आतापर्यंत 7 कसोटी शतकं ठोकली असून सर्व सामने भारत जिंकला आहे.

मुंबई :  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना (WTC Final 2021) होणार आहे. येत्या 18 जून ते 23 जूनदरम्यान इंग्लंडमधील साऊथहॅम्प्टनमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. तर भारतीय संघ आज म्हणजेच 2 जून रोजी इंग्लंडसाठी टेकऑफ करेल. तत्पूर्वी पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू आणि स्टार क्रिकेट समालोचक रमीज राजाने (Ramiz Raza) मोठी भविष्यवाणी केलीय. भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माची जर बॅट तळपली तर तो न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात दुहेरी शतक ठोकेन, असं भाकित रमीज राजाने वर्तवलं आहे. (Former Pakistan Player Ramiz Raza on Rohit Sharma ICC World Test Championship Final 2021)

शुभमन आणि रोहित डावाची सुरुवात करणार?

अंतिम सामन्यात भारतीय डावाची सुरुवात आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल करतील, अशी अपेक्षा आहे. भारताकडे एवढे जबरदस्त आणि आक्रमक सलामीवीर आहे, ही खरं तर भारताच्या जमेची बाजू आहे. रोहित आणि शुभमन गिलने त्यांच्या नैसर्गिक खेळ केला पाहिजे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने आक्रमक खेळ करत बॅटिंगचा मनमुराद आनंद लुटावा. अशात जर रोहित शर्माची बॅट बोलली तर तो दुहेरी शतक ठोकेन, असं रमीज राजा म्हणाले.

आक्रमक बॅट्समन भारताच्या जमेची बाजू

भारतीय संघात दोन आक्रमक बॅट्समन असावेत का? असा सवाल रमीज राजा यांना विचारण्यात आला. त्यावर, “नक्कीच असायला हवेत. कारण दोन आक्रमक बॅट्समन सोबत घेऊन खेळणं ही उलट भारतीय संघाच्या जमेच्या बाजू असेल. प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्यासाठी सलामीवीर रोहित आणि शुभमन गिलने आक्रमक खेळायला हवं”, असं ते म्हणाले. ते ‘इंडिया न्यूज’शी बोलत होते.

रोहित शर्माकडे प्रतिभा आणि क्षमता ठासून भरलेली

रोहित शर्मा मॅचविनिंग खेळाडू आहे. त्याच्याकडे मोठा डाव खेळण्याची क्षमता आणि प्रतिभा दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात जर त्याची बॅट चालली तर तो दुहेरी शकत ठोकेन, असं राजा म्हणाले.

भारतीय संघासाठी आनंदाची बातमी

इंग्लंडला टेक-ऑफ करण्यासाठी तयार असलेल्या भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आहे (India tour of England). युके सरकारने अर्थात इंग्लंड सरकारनं एक मोठं पाऊल उचललं आहे. इंग्लंड सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय खेळाडूंना आपल्या पत्नीला त्यांच्यासोबत इंग्लंडला घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर फुलली असेल. या दौऱ्यात भारतीय संघाचे खेळाडू जवळपास साडेतीन ते चार महिने इंग्लंडला राहणार आहेत.

(Former Pakistan Player Ramiz Raza on Rohit Sharma ICC World Test Championship Final 2021)

हे ही वाचा :

WTC च्या अंतिम सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाला मोठा झटका, ‘हा’ हुकूमी एक्का होऊ शकतो संघाबाहेर

हॉटेलमधल्या ओळखीचं मैत्रीत रुपांतर, प्रेमाचा वसंत कधी फुलला ते ही कळलं नाही, शाकिबच्या बायकोची हिरॉईनलाही सर नाही…!

इंग्लंड सरकारच्या निर्णयाने विराटसेनेच्या ‘आनंद पोटात माईना…!’