
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटबद्दल मोठे विधान केले आहे. त्याने टीम इंडियाचा प्रमुख कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. एवढंच नव्हे तर त्याने विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्याबद्दलही विधानकरत त्यांचं समर्थन केलं आहे. ते दोघे ( विराट-रोहित) भारतीय टीमचा कणा आहेत आणि 2027 च्या वनडे वर्ल्डकप पर्यंत त्यांची गरज असेल असं आफ्रिदी म्हणाला.
कोहली- रोहित शर्मा टीमचा कणा
विराट कोहली आणि रोहित शर्मा हे केवळ भारतातच नाही तर जगातील सर्वात विश्वासार्ह एकदिवसीय फलंदाजांपैकी एक आहेत असं आफ्रिदीने नमूद केलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अलिकडच्या मालिकेतील दोन्ही खेळाडूंच्या दमदार कामगिरीकडे पाहता, हे दोघेही 2027 च्या एदिवसीय विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचा “कणा” राहतील असंही आफ्रिदी म्हणाला. “विराट आणि रोहित हे भारतीय फलंदाजीचा कणा आहेत हे खरं आहे. त्यांच्या अलीकडील कामगिरीकडे पाहता, हे स्पष्ट होते की ते 2027 च्या विश्वचषकापर्यंत सहज खेळू शकतात” अशा शब्दांत आफ्रिदीने त्यांचं सर्मथन केलं.
कमकुवत संघांविरुद्ध मिळू शकते विश्रांती
भारताने मोठ्या स्पर्धा आणि महत्त्वाच्या मालिकांमध्ये कोहली आणि रोहितला निश्चितच खेळवावे. पण, जर हा संघ एखाद्या कमकुवत प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळत असेल तर नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी दोघांनाही विश्रांती दिली जाऊ शकते. असंहही आफ्रिदी म्हणाला.
गंभीरवर थेट हल्ला
एकीकडे आफ्रिदीने विराच-रोहितचं समर्थन केलं, पण त्याचं सर्वात जास्त चर्चेतलं विधान ते होते जेव्हा त्याने भारतीय संघाचा मुख्य कोच गौतम गंभीरवर टीकास्त्र सोडलं. आफ्रिदी आणि गंभीर यांच्या मैदानावरही अनेकदा वाद झाले आहेत. आता आफ्रिदीने गंभीरवर पुन्हा टीका केली. “गौतमने प्रशिक्षक म्हणून ज्या पद्धतीने सुरुवात केली, त्यावरून त्याला असं वाटतं की नेहमी तोच योग्य असतो. पण काही काळानंतर हे स्पष्ट झालं की तुम्ही नेहमीच बरोबर असू शकत नाही.” अशा शब्दांत आफ्रिदीने सुनावलं.
त्याचं हे विधआन अशा वेळेस आलं जेव्हा गंभीरने आधीच स्पष्ट केलं की 2027 चा विश्वचषक अजून खूप दूर आहे आणि संघ तरुण खेळाडूंना अधिक संधी देऊन एक नवीन दिशा देऊ इच्छितो. त्यामुळे आफ्रिदीने गंबीरवर निशाणा साधल्याची मोठी चर्चा सुरू आहे.
रोहितने रेकॉर्ड तोडल्यामुळेही आफ्रिदी खुश
वनडमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा आफ्रिदीचा रेकॉर्ड रोहित शर्माने नुकताच मोडला. मात्र त्यामुळेही आफ्रिदी खूप खुश झाला आहे. ” रेकॉर्ड हे मोडण्यासाठीच असतात. मला या गोष्टीचा आनंद आहे की माझा रेकॉर्ड ज्याने मोडला तो रोहित शर्मासारखा क्लासी फलंदाज आहे” अशा शब्दात आफ्रिदीने रोहित शर्माचं कौतुक केलं. रायपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात रोहित शर्माने 355 वा षटकार मारून आफ्रिदीला ( 351 सिक्सर) मागे टाकलं होतं.