AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : विराट कोहलीचा मास्टरस्ट्रोक, घेतला मोठा निर्णय…

टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली याने एक मास्टरस्ट्रोक खेळण्याची योजना आखली आहे. त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. विराट पुढे काय करणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Virat Kohli : विराट कोहलीचा मास्टरस्ट्रोक, घेतला मोठा निर्णय...
विराट कोहलीImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Dec 09, 2025 | 8:44 AM
Share

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरिजमध्ये विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट अक्षरश: तळपली. लागोपाठ शकत झळकावून त्याने धमाकेदार बॅटिंग दाखवली. त्यानंतर आता भारताच्या या स्टार फलंदाजाने एकमोठा निर्णय घेतला आहे. विराटने क्रिकेटच्या मैदानाप्रमाणेच आता बिझनेसच्या मैदानावरही मोठी खेळी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. कोहलीबद्दल समोर आलेल्या मोठ्या बातमीनुसार, विराट हा त्याची One8 कंपनी विकणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार, विराट ही कंपनी ॲजिलिटासला विकरणार आहे. एवढंच नव्हे तर तो या कंपनीत भागीदारीसाठी खरेदी करण्यासाठी 40 कोटी रुपयांची गुंतवणूक देखील करेल. वन8 ही ॲजिलिटासनेविकत घेतलेलील दुसरी कंपनी ठरेल, याआधी त्यांनी मोचिको शूज कंपनी विकत घेतली होती.

विराटच्या One8 ची किंमत किती ?

One8 ब्रँडचे रेस्टॉरंट तर आहेच, पण यातर्फे लाइफस्टाइल प्रॉडक्टसही बनवले जातात, ज्याचे नेटवर्थ 112 कोटी रुपये असल्याचे सांगितलं जातं. विराट कोहलीचा बालपणीचा मित्र वर्तिक तिहारा आणि मोठा भाऊ विकास कोहली ही कंपनी चालवतात. आता, ॲजिलिटास ती (कंपनी) विकत घेणार आहे. यापूर्वी ॲजिलिटासने विकत घेतलेली मोचिको शूज ही कंपनी ॲडिडास, प्यूमा, न्यू बेसन्स, स्केचअप, रीबॉक आणि क्रॉक्स सारख्या कंपन्यांसाठी शूज बनवते. आता, विराट कोहली या कंपनीत भागीदार म्हणून सामील होत आहे.

यशस्वी क्रिकेट आणि बिझनेसमनही

क्रिकेटच्या मैदानावरचा विराटचा कारनामा आपण सर्वांनीच पाहिला आहे. पण विराट हा केवळ एक उत्कृष्ट क्रिकेटपटूच नाही तर एक यशस्वी उद्योजक देखील आहे. त्याची एकूण संपत्ती 1000 कोटींपेक्षा जास्त आहे आणि यात त्याच्या व्यवसायाचा मोठा वाटा आहे. विराटने फॅशन, फिटनेस, फूड, टेक आणि क्रीडा क्षेत्रातील 13 हून अधिक व्हेंचर्समध्ये गुंतवणूक केली आहे. तो काही ब्रँड्सचा सह-मालक आहे. वन8 व्यतिरिक्त, विराटने Wrogn, Nueva आणि चिझल फिटनेसमध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच एफसी गोवा, युएई रॉयल्स, बंगळुरू योद्धा अशा स्पोर्ट्स टीमचा ते को-ओनरही (सहमालक) आहे. एवढंच नव्हे तर गो डिजीटया इन्श्युरन्स कंपनीतही विराटने गुंतवणूक केली आहे.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.