AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Dravid चा मुलगा समितला तगडा झटका, पप्पा इतके मोठे खेळाडू आणि मुलासोबत असं व्हावं

राहुल द्रविड हे भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव आहे. टीम इंडियाच कर्णधारपद भूषवणारे द्रविड भारतीय संघाचे हेड कोच सुद्धा होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्यावर्षी टीम इंडियाने दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला. राहुल द्रविड यांच्याप्रमाणे त्यांचा मुलगा सुद्धा उत्तम क्रिकेटर आहे. पण समितसोबत गृहराज्यात जे झालं, तो द्रविडसाठी झटका आहे.

Rahul Dravid चा मुलगा समितला तगडा झटका, पप्पा इतके मोठे खेळाडू आणि मुलासोबत असं व्हावं
Rahul Dravid-Samit DravidImage Credit source: PTI/SCreenshot/X
| Updated on: Jul 16, 2025 | 1:20 PM
Share

भारतीय टीमचा माजी कर्णधार आणि माजी दिग्गज कोच राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविडला मोठा झटका बसला आहे. कूच बिहार ट्रॉफी स्पर्धेतील शानदार प्रदर्शनानंतरही ऑलराऊंडर असलेल्या समितकडे घरातच दुर्लक्ष करण्यात आलं. कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या (KSCA) वतीने आयोजित होणाऱ्या एका लीगमध्ये समित द्रविडला कुठल्याच टीमने विकत घेतलं नाही. मागच्यावर्षी तो या लीगमध्ये खेळला होता. यावेळी समित द्रविड अनसोल्ड ठरला. राहुल द्रविड हे राजस्थान रॉयल्सचे हेड कोच आहे. त्यांच्या मुलाला कोणी विकत न घेणं हा एक झटका आहे.

समित द्रविडला महाराजा ट्रॉफी 2025 च्या ऑक्शनमध्ये कुठल्याही टीमने विकत घेतलं नाही. मागच्या सीजनमध्ये तो मैसूर वॉरियर्स टीमकडून खेळला होता. पण यावेळी अनसोल्ड राहिला. मैसूर वॉरियर्सने मागच्यावर्षी किताब जिंकला होता. पण समितच प्रदर्शन काही खास नव्हतं. समित महाराजा ट्रॉफी स्पर्धेत 2024 साली मैसूरकडून सात सामने खेळला होता. यात त्याने 11.71 च्या सरासरीने केवळ 82 धावा केल्या. त्याशिवाय एकही विकेट घेतला नाही.

शानदार प्रदर्शन करुनही दुर्लक्ष

मागच्यावर्षी त्याने कूच बिहार ट्रॉफीत शानदार खेळ दाखवलेला. त्याने 8 मॅचमध्ये 362 धावा केल्या होत्या. 16 विकेट काढलेले. फायनलमध्ये शानदार प्रदर्शन केलेलं. त्या बळावर कर्नाटकने मुंबईवर विजय मिळवलेला. महाराजा ट्रॉफी 2025 यंदा 11 ते 27 ऑगस्ट दरम्यान खेळली जाणार आहे. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने होतील. यावेळी या लीगमध्ये काही मोठे खेळाडू खेळताना दिसतील.

महागडा खेळाडू कोण ठरला?

इंडियन प्रीमियर लीग (IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमकडून खेळणारा फलंदाज देवदत्त पडिक्कल महाराजा ट्रॉफी 2025 मधील सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला हुबली टायगर्सने 13.20 लाखात विकत घेतलं आहे. सनरायजर्स हैदराबादकडून खेळणारा अभिनव मनोहर आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणारा मनीष पांडेय संयुक्तरित्या दुसरे महागडे खेळाडू आहेत.

अन्य प्लेयर्सना किती लाखात विकत घेतलं?

अभिनव मनोहरला 12.20 लाख रुपयात हुबळी टायगर्सने विकत घेतलं आहे. मनीष पांडेयचा 12.20 लाख रुपयात मैसूर वॉरियर्स टीममध्ये समावेश झाला. शिवमोगा लायन्सने कर्नाटकचा वेगवान गोलंदाज विद्वाथ कवरप्पाला 10.80 लाख रुपयात विकत घेतलय. बंगळुरु ब्लास्टर्सने वेगवान गोलंदाज विद्याधर पाटिल को 8.30 लाख रुपयात विकत घेतलय. शिवमोगा लायन्सने भारत ए चा फलंदाज अनीश्वर गौतमला 8.20 लाख रुपयात विकत घेतलय.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.