IPL 2023 : आयपीएलमध्ये चार संघ अजूनही जेतेपदापासून दूर, आता कसे आहेत संघ? जाणून घ्या

आयपीएल स्पर्धेचं जेतेपद हे फ्रेंचाईसीसाठी प्रतिष्ठेचं झालं आहे. त्यामुळे संघ ताकदीने मैदानात उतरावा यासाठी कोट्यवधी रुपये खर्च चांगले खेळाडू संघात घेतले जातात. पण असं असूनही अनेकदा पदरी अपयश पडतं.

IPL 2023 : आयपीएलमध्ये चार संघ अजूनही जेतेपदापासून दूर, आता कसे आहेत संघ? जाणून घ्या
IPL 2023 : आयपीएलमध्ये चार संघ अजूनही जेतेपदापासून दूर, आता कसा आहे संघ? जाणून घ्याImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 10:08 PM

मुंबई – आयपीएल स्पर्धा जगातील श्रीमंत लीग स्पर्धा आहे. या स्पर्धेत खोऱ्याने पैसा ओतला जातो. त्यामुळे जेतेपद मिळवण्यासाठी खेळाडू जीवाचं रान करतात. आक्रमक खेळी करत षटकार चौकारांची बरसात करतात. आतापर्यंत आयपीएल 15 पर्व झाले आहेत. मात्र अजूनही काही संघांना जेतेपद मिळवता आलेलं नाही. तर मुंबई इंडियन्सनं पाच आणि चेन्नई सुपर किंग्सनं चारवेळा जेतेपद जिंकलं आहे.असं असलं तरी चार संघांच्या नशिबी चांगले खेळाडू घेऊनही उपेक्षा आली आहे. दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जायन्ट्स किताब जिंकलेला नाही.

लखनऊचा संघ मागच्या पर्वापासून स्पर्धेत उतरला आहे. या संघाचे काही खेळाडू जबरदस्त फॉर्मात आहेत. त्यामुळे कधीही कसाही सामना फिरवू शकतात. दुसरीकडे, विराट आयपीएलमध्ये पहिल्या जेतेपदासाठी आतुर आहे. तर पंजाब किंग्सकडे तगडे खेळाडू आहेत पण दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. दिल्ली कॅपिटल्सचं नशिबही असंच काहीसं आहे. पण तरीही जेतेपद मिळवणं कठीण नाही.

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा डेविड वॉर्नरच्या खांद्यावर आहे. ऋषभ पंतच्या गैरहजेरीत या संघाची धुरा त्याच्याकडे सोपवण्यात आली आहे. डेविड वॉर्नरने सनराईजर्स हैदराबादला 2016 मध्ये जेतेपद पटकावून दिलं होतं. त्यामुळे वॉर्नरची बॅट तळपली तर सर्वकाही शक्य आहे, असंच म्हणावं लागेल. दुसरीकडे संघात अष्टपैलू अक्षर पटेल महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. अक्षर पटेलही चांगला फॉर्मात आहे.

पंजाब किंग्स

पंजाब किंग्स जेतेपद जिंकण्यासाठी चांगले खेळाडू आपल्या ताफ्यात आणते. पण ऐन मोक्याच्या वेळी खेळाडू चालत नसल्याने गोची होते. यंदाही पंजाब किंग्स आपलं नशीब आजमावणार आहे. मॅनेजमेंटने अष्टपैलू सॅम करनला संघात सहभागी केलं आहे. 18.50 कोटी खर्च केले असून त्याच्याकडून अपेक्षा आहेत. दुसरीकडे कगिसो रबाडा देखील गोलंदाजीत माहिर आहे. त्यामुळे दोन खेळाडू की होल्डर ठरतील.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

आरसीबीमध्ये विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलसारखे स्टार खेळाडू आहेत. पण किताब जिंकणं अजूनही शक्य झालं नाही. फलंदाजीसाठी फाफ डु प्लेसिस, दिनेश कार्तिक संघात आहेत. त्यामुळे यंदा जेतेपदाची अपेक्षा वाढली आहे. गोलंदाजीची कमान जोश हेझलवूड, वानिंदु हसारंगा आणि मोहम्मद सिराजवर असेल.

लखनऊ सुपर जायन्ट्स

लखनऊची धुरा कर्णधार केएल राहुलच्या खांद्यावर आहे. तर फलंदाजीच्या भात्यात क्विंटन डिकॉक आहे. हे अस्त्र वेस्ट इंडिजविरुद्ध जबरदस्त चाललं होतं. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मार्कस स्टोईनिस आहे. मधल्या फळीत फलंदाजीही करू शकतो. त्यामुळे या तीन खेळाडूंवर लखनऊची मदार असणार आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये चारपैकी कोणाचं नशिब उघडतं हे येणारा काळच सांगेल.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.