AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : गौतम गंभीरने विराटला थेट निवृत्तीबद्दल विचारलं? हैराण करणारी बातमी समोर

Virat Kohli : विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्ध शानदार शतक झळकवून टीकाकरांची तोंड बंद केली आहेत. मोठ्या मॅचमध्ये छाप उमटवण्याची अजूनही क्षमता आहे, हे त्याने आपल्या प्रदर्शनाने सिद्ध केलय.

Virat Kohli : गौतम गंभीरने विराटला थेट निवृत्तीबद्दल विचारलं? हैराण करणारी बातमी समोर
Virat Kohli Image Credit source: PTI
| Updated on: Feb 25, 2025 | 8:19 AM
Share

विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्ध शानदार शतक झळकवून फक्त भारताला विजयच मिळवून दिला नाही, तर आपल्या फलंदाजीवर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिलं. मागच्या काही काळापासून विराट कोहलीचा धावा बनवण्यासाठी संघर्ष सुरु होता. पण पाकिस्तान विरुद्धच्या इनिंगने त्याने टीकाकारांची तोंड बंद केली. अलीकडेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत त्याच्या प्रदर्शनावरुन अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. या दौऱ्याशी संबंधित एक खुलासा झाला आहे. त्याने सगळेच हैराण आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर फ्लॉप ठरल्यानंतर भारतीय टीमचे हेड कोच गौतम गंभीर यांनी कोहलीला त्याच्या भविष्याच्या योजनांबद्दल विचारलं होतं. गौतम गंभीर आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी विराट कोहलीसोबत या विषयी चर्चा करण्याच ठरवलं होतं. मेलबर्नमध्ये चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव झाल्यानंतर विराट कोहलीच्या निवृत्तीचा प्रश्न उपस्थित झालेला. दोघांनी कोहलीला विचारलेलं, भविष्याबाबत काही स्पष्ट योजना आहे का? कोहलीसाठी हा हैराण करणारा प्रश्न होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटच हे कितवं शतक?

विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्ध शानदार शतक झळकवून टीकाकरांची तोंड बंद केली आहेत. मोठ्या मॅचमध्ये छाप उमटवण्याची अजूनही क्षमता आहे, हे त्याने आपल्या प्रदर्शनाने सिद्ध केलय. पाकिस्तान विरुद्ध या मॅचमध्ये कोहलीने आपलं 51 वं वनडे शतक झळकावलं. एकप्रकारे हे विराटच शानदार पुनरागमन आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराट कोहलीच हे 82 व शतक आहे. पाकिस्तान विरुद्धच्या या इनिंग दरम्यान विराटने वनडे क्रिकेटमध्ये आपल्या 14 हजार धावा पूर्ण केल्या.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसं प्रदर्शन होतं?

विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपल्या प्रदर्शनाने निराश केलं. तिथे त्याने पहिल्या कसोटीत शतक झळकवलं. पण त्यानंतर 8 इनिंगमध्ये विराटने फक्त 90 धावा केल्या. सीरीजमध्ये त्याचा स्ट्राइक रेट 23.75 होता. यावेळी त्याच्या खेळावर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं. पण आता शतक झळकवून त्याने टीममध्ये अजूनही खेळण्यास सक्षम आहोत, हे दाखवून दिलय.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.