भज्जीच्या घरी येणार आणखी एक चिमुकला पाहुणा ! सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’

हरभजन सिंहची (Harbhajan Singh) पत्नी गीता बसराने (Geeta Basra) इंस्टाग्रामवर बेबी बंपसह फोटो शेअर केला आहे.

भज्जीच्या घरी येणार आणखी एक चिमुकला पाहुणा ! सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’
हरभजन सिंहची (Harbhajan Singh) पत्नी गीता बसराने (Geeta Basra) इंस्टाग्रामवर बेबी बंपसह फोटो शेअर केला आहे.
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 5:55 PM

मुंबई : टीम इंडियाचा फिरकीपटू हरभजन सिंहच्या (harbhajan singh) घरी लवकरच लहान पाहुण्याचं आगमन होणार आहे. हरभजन दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. हरभजनची पत्नी गीता बसराने ((Geeta Basra) इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये स्वत: गीता बसरा, हरभजन आणि त्याची मुलगी दिसत आहे गीताने बेबी बंपसह हा फोटो शेअर केला आहे. “लवकरच जुलै 2021” असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे. तसेच या फोटोमध्ये हरभजनची मोठी मुलगी हिनायाच्या हातात एक टी शर्ट दिसत आहे. या टी शर्टवर “मी लवकरच मोठी बहिण होणार”, असं लिहिलेलं आहे. (Harbhajan Singh and Geeta Basra will be parents for the second time)

पहिलं कन्यारत्न

हरभजन आणि गीता यांना 2016 मध्ये पहिल्यांदा अपत्य प्राप्ती झाली होती. 27 जुलै 2016 मध्ये तिने हिनाया हीरला (Hinaya Heer Plaha) जन्म दिला होता.

2015 मध्ये विवाहबद्ध

हरभजनने 2015 मध्ये अभिनेत्री गीता बसरासोबत लग्न केलं होतं. लग्नाआधी या दोघांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. गीताने दिल दिया है, द ट्रेन किंवा जिला गाजियाबाद अशा चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

हरभजन आयपीएलमध्ये कोलकाताकडून खेळणार

हरभजन आयपीएलच्या 14 व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार आहे. हरभजनला चेन्नईने रिलीज केलं होतं. त्यामुळे कोलकाताने 2 कोटी मोजून हरभजनला आपल्या ताफ्यात घेतलं.

हरभनजची आयपीएल कारकिर्द

हरभजनने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 160 सामने खेळले आहेत. यात त्याने 7.05 इकॉनॉमी रेटसह तसेच 26.45 सरासरीने 150 विकेट्स घेतल्या आहेत. 18 धावा देऊन 5 विकेट्स ही हरभजनची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.

हरभजनने बोलिगंसह बॅटिंगनेही जलवा दाखवला आहे. त्याने 138.17 च्या स्ट्राईक रेटने 829 धावा चोपल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. 64 ही हरभजनची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने यामध्ये 79 चौकार आणि 42 सिक्स खेचले आहेत. हरभजनने आयपीएलच्या 13 व्या मोसमातून वैयक्तिक कारणाने माघार घेतली होती. त्यामुळे 14 व्या मोसमात हरभजनच्या कामगिरीकडे सर्वांचच लक्ष असणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2021: हरभजन सिंग चेन्नई सुपरकिंग्जच्या संघातून बाहेर पडणार

हरभजन सिंह क्रिकेटनंतर अभिनय क्षेत्रात लावणार चौके-छक्के, पाहा ‘फ्रेंडशिप’ चित्रपटाचा टीझर!

(Harbhajan Singh and Geeta Basra will be parents for the second time)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.