AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: हरभजन सिंग चेन्नई सुपरकिंग्जच्या संघातून बाहेर पडणार

इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धेतील चेन्नई सुपरकिंग्जच्या (Chennai Super Kings) संघातून तो बाहेर पडणार आहे. | Harbhajan Singh CSK

IPL 2021: हरभजन सिंग चेन्नई सुपरकिंग्जच्या संघातून बाहेर पडणार
| Updated on: Jan 20, 2021 | 2:35 PM
Share

नवी दिल्ली: भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh)  याने एक मोठा निर्णय घेतला आहे. इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धेतील चेन्नई सुपरकिंग्जच्या (Chennai Super Kings) संघातून तो बाहेर पडणार आहे. हरभजनने बुधवारी ट्विटवरून ही घोषणा केली. (Harbhajan Singh Announces End Of IPL Contract With Chennai Super Kings)

या ट्विटमध्ये हरभजन सिंगने म्हटले आहे की, चेन्नई सुपरकिंग्ज संघाबरोबरचा माझा करार संपुष्टात आला आहे. या संघासोबत खेळणे एक उत्तम अनुभव होता. चेन्नईकडून खेळताना अनेक चांगल्या आठवणी आणि मित्र मिळाले. त्यांना मी नेहमीच लक्षात ठेवेन. चेन्नई सुपरकिंग्जचा संघ, व्यवस्थापन आणि त्यांच्या चाहत्यांचे मी आभार मानतो, असे हरभजनने सांगितले.

2020 च्या आयपीएल स्पर्धेतून हरभजन सिंगची माघार

हरभजन सिंगने गेल्यावर्षीच्या आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. वैयक्तिक कारणामुळे त्याने हा निर्णय घेतला होता. हरभजन हा आयपीएल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत 150 बळी टिपले आहेत. लसिथ मलिंगा (170), अमित मिश्रा (160), पीयूष चावला (156), ड्वेन ब्राव्हो (153) या मोजक्याच गोलंदाजांना अशी कामगिरी जमलेली आहे.

गेल्यावर्षीच्या आयपीएल स्पर्धेत चेन्नईची सुमार कामगिरी

2020 साली झालेल्या आयपीएल स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जची कामगिरी अत्यंत सुमार झाली होती. या संघात अनेक वरिष्ठ खेळाडुंचा भरणा होता. हीच बाब संघासाठी डोकेदुखी ठरली होती. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही स्तरावर चेन्नई सुपरकिंग्जच्या एकाही खेळाडूने लौकिकाला साजेशी कामगिरी केली नव्हती. त्यामुळे यंदाच्या वर्षात संघ व्यवस्थापनाकडून चेन्नईच्या टीममध्ये मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

चेन्नईची दुसरी विकेट! रैनापाठोपाठ आणखी एका दिग्गज खेळाडूची माघार

विराटवर कर्णधार पदाचा कोणताही दबाव नाही, सलग दुसऱ्या पराभवानंतर टीकेचा धनी झालेल्या कोहलीची हरभजनकडून पाठराखण

ऑस्ट्रेलियाविरोधातील टी 20 मालिकेत अपयशी ठरलेल्या संजू सॅमसनला हरभजनचा मोलाचा सल्ला

(Harbhajan Singh Announces End Of IPL Contract With Chennai Super Kings)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.