AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya : भर मैदानात चढला हार्दिक पंड्याचा पारा, सीनिअर खेळाडूशी वाद?, Video व्हायरल

रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध सहज विजय मिळवला. मात्र या सामन्यापूर्वी क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि माजी क्रिकेटपटू मुरली कार्तिक या दोघांचं वाजलं. त्यांचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे.

Hardik Pandya : भर मैदानात चढला हार्दिक पंड्याचा पारा, सीनिअर खेळाडूशी वाद?,  Video व्हायरल
हार्दिंक पंड्याने भर मैदानात घातला वाद ?
| Updated on: Jan 24, 2026 | 12:52 PM
Share

रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्युझीलंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने अगदी सहज विजय मिळवला. यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे. मात्र याच टी-20 सामन्यापूर्वी घडलेल्या एका घटनेने मोठी खळबळ माजली. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि माजी क्रिकेटपटू मुरली कार्तिक यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावेळी दोघांमध्ये मैदानावर जोरदार वाद झाला असा दावा करण्यात येत आहे. मॅच सुरू होण्यापूर्वीचा हा व्हिडीओ असून स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका चाहत्याने हे भांडण रेकॉर्ड केल्याचे समजते.

हार्दिक पांड्या आणि मुरली कार्तिकमध्ये झाला वाद ?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसतं की हातात बॅट आणि ग्लोव्ह्ज घेऊन हार्दिक पंड्या प्रॅक्टिससाठी मैदानावर उतरला. तो काही पावलं चालल्यावर मुरली कार्तिकशी त्याची भेट झाली. दोघांनी हँडशेक करून एकमेकांशी बोलायला सुरूवात केली. मात्र पाहता पाहता त्यांचं बोलणं भराभर होऊ लागल. त्यावेळी हार्दिक पंड्या खूप रागात दिसत होता आणि हातावेर करून तो काही बोलू लागला. तर दुसरीकडे मुरली कार्तिक हा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत होता. मात्र हार्दिक कोणत्या तरी गोष्टीवरून नाराज आहे, हे त्याच्या हातवाऱ्यांवरून आणि हावभावावरून दिसत होतं. पण त्या दोघांमध्ये वाद नेमका कशामुळे झाला हे कारण काही स्पष्ट झालेलं नाहीये.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, जिथे अनेक युजर्सनी तो शेअर केला आहे, ज्यामध्ये हार्दिक पांड्या मुरली कार्तिकवर रागावलेला दिसतोय. काही पोस्टमध्ये याला ‘हीटेड आर्ग्युमेंट’ म्हणण्यात आलं. सुरूवातील दोघांमध्ये नॉर्मल असलेलं वातावरण नंतर खूप तणावपूर्ण झालं.भारताचा माजी खेळाडू असलेला मुरली कार्तिक हा ब्रॉडकास्ट टीमचा भाग होता आणि सामन्यासाठी कॉमेंट्री करत होता. सामन्यादरम्यानही ही घटना चर्चेत होती.

हार्दिकचा परफॉर्मन्स कसा ?

कालची मॅच टीम इंडियासाठी खूप चांगली होती. 209 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने फक्त 15.2 ओव्हर्समध्ये पूर्ण केले. हार्दिक पंड्याने या मॅचमध्ये बोलिंग करत चांगले योगदान दिले. त्याने त्याच्या 3 षटकांत फक्त 25 धावा दिल्या आणि एक बळी टिपला.

मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.