AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi : IPL च्या एका मॅचद्वारे वैभव सुर्यवंशी याला किती कमाई होते?

Vaibhav Suryavanshi IPL Earnings: राजस्थान रॉयल्सचा शानदार खेळाडू वैभव सूर्यवंशी याने आरसीबीच्या विरोधात स्फोटक खेळी केली. चला पाहूयात एका आयपीएल मॅचद्वारे त्याची किती कमाई होते.

Vaibhav Suryavanshi : IPL च्या एका मॅचद्वारे वैभव सुर्यवंशी याला किती कमाई होते?
Vaibhav Suryavanshi
| Updated on: Apr 11, 2026 | 10:37 PM
Share

Vaibhav Suryavanshi IPL Earnings: आयपीएल २०२६ च्या १६ व्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर बंगलुरुला ६ विकेटने हरवून धक्का दिला. राजस्थान रॉयल्सच्या वतीने वैभव सुर्यवंशी पुन्हा एकदा चमकला. वैभव सुर्यवंशीने जबरदस्त खेळत केवळ २६ चेंडूत ७८ रन बनवले.या युवा फलंदाजाने न केवळ मॅच जिंकून दिली शिवाय रातोरात आपली कमाई देखील अनेक पटीने वाढवली. चला पाहूयात वैभव सुर्यवंशी एका आयपीएल मॅचमागे किती कमाई करतो हे पाहूयात..

राजस्थान रॉयल्स सोबत कॉन्ट्रॅक्टची किंमत

वैभव सुर्यवंशी याने सध्या आयपीएल २०२६ सिझनसाठी राजस्थान रॉयल्ससोबत एकूण १.१० कोटींचे कंत्राट साईन केले आहे.या फ्रेंचायजीकडून त्यांची ही मूळ कमाई आहे. भले त्याचे कोणत्याही मॅचमध्ये कसेही प्रदर्शन असो ही फी त्याला मिळणे पक्के आहे.

प्रति मॅच किती मिळतात ?

जर त्याचे एकूण कॉन्ट्रॅक्टला १४ मॅचच्या एका सामान्य लीग सिझनमध्ये वाटले तर त्याची मूळ कमाई सुमारे ७.८५ लाख रुपये प्रति मॅच मिळते. ही निश्चित रक्कम आहे जी फ्रेंचायजी त्याच्या सेवेसाठी प्रत्येक मॅचमागे खर्च करते.

अतिरिक्त मॅच फी

कंत्राटाशिवाय आयपीएल खेळाडूंना मॅच फी देखील मिळते. सध्याच्या नियमांनुसार ही फी प्रत्येक मॅच मागे ७.५० लाख रुपये असते. ही रक्कम वेगळी दिली जाते. आणि त्यांची एकूण कमाईत वाढ करते.

प्रति मॅच एकूण कमाई

जेव्हा दोन्ही भागांना एकत्र केले तर वैभव याची एकूण कमाई एका मॅच मागे सुमारे १५.३५ लाख होते. म्हणजे या कमाईत कंत्राटाचा हिस्सा आणि मॅच फी दोन्हीचा समावेश आहे. वैभव याच्या जबरदस्त कामगिरीमुळे त्याची वास्तविक बाजार मुल्यात खूपच जास्त वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

बिहारचा राहणारा वैभव सुर्यवंशी याचा प्रवास त्याच्या फलंदाजीप्रमाणे शानदार आहे. घरगुती क्रिकट पासून ते आयपीएलच्या व्यासपीठापर्यंत वैभव त्या नव्या पिढीचे प्रतिनिधीत्व करतो जे एका क्षणात मॅचचे स्वरुप बदलू शकतात.

वैभव सूर्यवंशी याचा प्रवास

वैभव सूर्यवंशी याचा जन्म बिहारच्या समस्तीपुर जिल्ह्यातील ताजपूर गावात झाला. तो एका शेतकरी कुटुंबातील आहे. केवळ चार वर्षांचा असताना त्याचे वडील संजीव सुर्यवंश यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. त्याने क्रिकेट शिकण्यासाठी समस्तीपूर येथील एका स्थानिय अकादमीपासून ते पाटणा आणि मुझफ्फरपूरपर्यंतचा प्रवास केला आहे.त्याने क्रिकेटमध्ये बिहारला रिप्रेजेंट करत खूपच कमी वयात आपली ओळख बनवली. आणि आता आयपीएलच्या इतिहासातील तो सर्वात युवा खेळाडू बनला आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.