
भारतीय क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिचे लग्न संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchhal) याच्यासोबत 23 नोव्हेंबर 2025 रोजी होते. मात्र, वडिलांच्या तब्येतीचे कारण पुढे देत हे लग्न पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर 7 डिसेंबर 2025 रोजी स्मृती मानधना आणि पलाश लग्न करणार असल्याचे सांगितले गेले. मात्र, स्मृती मानधना हिने 7 डिसेंबरच्या दुपारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आणि हे लग्न मोडल्याचे जाहीर केले. मात्र, तिने या पोस्टमध्ये कुठेच लग्न का मोडले याचा साधा उल्लेखही केला नाही. स्मृती मानधना आणि पलाश यांचे लग्न पुढे ढकलल्यापासून हैराण करणारी खुलासे केली जात आहेत. त्यामध्येच काही स्क्रीनशॉर्टही व्हायरल झाली. संगीत, हळद आणि मेहंदीनंतर हे लग्न मोडण्यात आले. अखेर सांगलीत लग्नाच्या आदल्या रात्री नेमके काय घडले, याबद्दल धक्कादायक खुलासा होताना दिसतोय.
पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना यांच्या लग्नाच्या आदल्या रात्री फार्म हाऊसवर मोठा राडा झाला होता. हेच नाही तर पलाश मुच्छल याला रंगेहात पकडण्यात आले. याबाबतची एक इन्स्टाग्रामवर पोस्ट मागील काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. या पोस्टमध्ये काही हैराण करणारी आणि धक्कादायक खुलासे करण्यात आले होते. पलाश मुच्छल याला स्मृती मानधना हिने रंगेहात पकडल्यानंतर मोठा राडा झाला आणि पलाशने स्वत:ची प्रतिमा चांगली दाखवण्यासाठी पूर्ण सेटिंग केली.
पलाशने स्वत:ची बदनामी टाळण्यासाठी थेट एका पीआर कंपनीला मोठा पैसाही मोजला. अधिकृत माहिती नसली तरीही त्या इंस्टापोस्टनुसार, तब्येचे कारण देत पलाश मुच्छल याने भीतीनेच मुंबई गाठली. पलाश मुच्छल याला डान्स शिकवण्यासाठी नंदिका द्विवेदी कोरिओग्राफर होती. सांगलीत आल्यापासून दोघांमध्ये काहीतरी सुरू होते. लग्नाच्या आदल्या दिवशी स्मृती मानधना आपल्या मैत्रिणींसोबत धमाल करत होती. यावेळी टीम इंडियाची क्रिकेटपटू श्रेयांका पाटील हिने पलाश मुच्छल आणि नंदिका द्विवेदी यांना इंटिमेट अवस्थेत पाहिले.
श्रेयांका पाटील हिने अजिबात वाट न बघता स्मृती मानधना हिला बोलावले आणि स्मृती मानधना हिने देखील पलाशला आणि नंदिका द्विवेदीला नको त्या अवस्थेत बघितले. स्मृती मानधना हिच्या भावाने पलाशला मारहाण देखील केली. ज्यावेळी हे सर्व घडले, त्यावेळी तिथे फार कमी लोक उपस्थित होते. पाहुणे जवळपास झोपी गेले होते. सकाळी त्यांना स्मृती मानधना हिच्या वडिलांची तब्येत खराब झाल्याचे सांगितले गेले. रात्री मोठा राडा झाला होता. आपले काही खरे नाही हे कळताच पलाश याने तब्येतीचे कारण देत तिथून पळ काढला.