AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पहिला सामना जरी गमावला असला तरीही वैभवला खेळवू नकाच’, आयर्लंड दुसऱ्या टी-20 मॅचपूर्वी माजी खेळाडू असं का म्हणाला?

भारत आयर्लंड यांच्यात दुसरा टी-20 सामना आज रंगणार आहे. पहिल्या सामन्यातील लाजिरवाणा पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात वैभवला संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. पण त्याला खेळवू नका असा सल्ला माजी क्रिकेटपटूने दिला आहे.

'पहिला सामना जरी गमावला असला तरीही वैभवला खेळवू नकाच', आयर्लंड दुसऱ्या टी-20 मॅचपूर्वी माजी खेळाडू असं का म्हणाला?
| Updated on: Jun 28, 2026 | 3:20 PM
Share

भारत आणि आयर्लंड यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना आज रंगणार आहे. या मालिकेपूर्वीपासूनच एक चर्चा जोरदार सुरु होती आणि ती म्हणजे वैभव सूर्यवंशीचा डेब्यू. या मालिकेत वैभवला डेब्यू होणार असे सगळ्यांना वाटत होते पण तसे अजून तरी झालेले नाही. पहिल्याच सामन्यात वैभवला खेळायची संधी मिळेल असेही वाटत होते पण तसे काही झाले नाही. आता आद रंगणाऱ्या दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला पदार्पण मिळते का या कडे सर्वांचे लक्ष असणार आहे. अनेकांनी वैभवला पहिल्या सामन्यात का खेळवले नाही असा प्रश्नही उपस्थित केले होते. पण सगळे वैभवला खेळवायला हवं अशी मागणी करत असताना मात्र मााजी खेळाडूंना एक भलतीच मागणी केली आहे.

माजी सलामीवीर आकाश चोप्रा यांनी म्हटले आहे की, “रविवार, 28 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी ते वैभव सूर्यवंशीची भारतीय संघात निवड करणार नाहीत.” शुक्रवार, २६ जून रोजी बेलफास्ट येथे यजमान संघाकडून भारतीय संघाला झालेल्या धक्कादायक पराभवानंतर हे विधान आले आहे.

भारताची फलंदाजी निराशाजनक होती आणि संघ 148 धावांवर सर्वबाद झाला, लक्ष्यापासून 34 धावा दूर राहिला. संजू सॅमसन, ईशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांसारख्या खेळाडूंनी खराब कामगिरी केली, ज्यामुळे सूर्यवंशीला भारतासाठी बहुप्रतिक्षित पदार्पण करण्याची संधी मिळू शकली असती. मात्र, चोप्रा यांचे मत पूर्णपणे वेगळे आहे.

आकाश चोप्रा म्हणाले की,”पुढच्या सामन्यात वैभवला खेळवायचे की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न असेल. हा एक अवघड निर्णय आहे. ईशान किशन आणि संजू सॅमसन यांनी धावा केल्या नाहीत. अभिषेक शर्मा वगळता कोणीही धावा केल्या नाहीत. यावर बरीच चर्चा सुरू आहे. जरी हे राजकीयदृष्ट्या योग्य वाटत नसले तरी मी वैभवला खेळवणार नाही. मी संजू सॅमसन किंवा ईशान किशनला संघातून वगळणार नाही. मी त्याच तीन फलंदाजांना खेळवीन आणि वेगळ्या निकालाची अपेक्षा करीन, आणि हे सामान्य आहे. पुढच्या वेळी, जर आम्हाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली, तर आम्ही 250 धावा करू शकतो. आम्ही त्याच पद्धतीने फलंदाजी करू कारण आमच्यात तसे करण्याची क्षमता आहे,” असे आकाश चोप्रा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले.”

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा