ICC ने विचारले दशकातील सर्वश्रेष्ठ कर्णधार कोण? क्रिकेट चाहते म्हणाले...

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रिकेटप्रेमींना या दशकातील सर्वश्रेष्ठ कर्णाधार (MS Dhoni Best Captain in Cricket) निवडायला सांगितले.

ICC ने विचारले दशकातील सर्वश्रेष्ठ कर्णधार कोण? क्रिकेट चाहते म्हणाले...

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रिकेटप्रेमींना या दशकातील सर्वश्रेष्ठ कर्णधार (MS Dhoni Best Captain in Cricket) निवडायला सांगितले. यावर क्रिकेट प्रेमींनी महेंद्रसिंह धोनी या दशकातला सर्वश्रेष्ठ कर्णधार असल्याचे सांगितले.

धोनीने 2014 मध्ये टेस्ट आणि 2017 मध्ये मर्यादीत षटकांमध्ये टीमचे कर्णधारपद सोडले होते. धोनीच्या (MS Dhoni Best Captain in Cricket) नेतृत्वात भारतीय टीमने 2007 मधील टी-20 विश्वकप, 2011 मधील विश्वकप आणि 2013 मधील चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

आम्हाला सांगा की, या दशकातील तुमचा आवडता कर्णधार कोण आहे?, असं आयसीसीने ट्वीट करत विचारले.

“आवडता कर्णधार, आवडता यष्टीरक्षक आणि आवडता खेळाडू, वन मॅन एमएस धोनी”, असं एका चाहत्याने म्हटले.

“एमएस धोनी आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ भारतीय कर्णधार आहे. तसेच जगातील सर्वश्रेष्ठ कर्णधारांपैकी एक आहे”, असं एका चाहत्याने म्हटले आहे.

“एमएस धोनीला पाकिस्तानकडून खूप प्रेम आणि सन्मान आहे”, असं एका पाकिस्तानी चाहत्याने ट्वीट करत म्हटले.

दरम्यान, एमएस धोनीने विश्वकप 2019 नंतर ब्रेक घेतला आहे. त्यानंतर तो आतापर्यंत मैदानात परतलेला नाही. धोनी पुन्हा खेळणार का यावरुन सध्या अनेक तर्क वितर्क चाहत्यांमध्ये सुरु आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *