AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC ने केला विराटचा अपमान ? न्युझीलंडच्या मॅचपूर्वी दुबईत घडलं तरी काय?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत टीम इंडियाचा पुढील सामना न्यूझीलंडशी होणार आहे. मात्र त्यापूर्वी, आयसीसीने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये भारतीय खेळाडू नेटमध्ये घाम गाळताना दिसत आहेत. पण त्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा शानदार फटके मारताना दिसत आहे, तर विराट मात्र...

ICC ने केला विराटचा अपमान ? न्युझीलंडच्या मॅचपूर्वी दुबईत घडलं तरी काय?
रोहित शर्मा आणि विराट कोहली Image Credit source: PTI
| Updated on: Mar 01, 2025 | 12:38 PM
Share

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आता रंगतदार स्थितीत आली आहे. भारतीय संघ आता दुबईत ग्रुप स्टेजमध्ये शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडशी भिडणार आहे. ग्रुप स्टेजमधील न्यूझीलंडचाही हा शेवटचा सामना असेल. रविवारी दोन्ही संघ एकमेकांशी भिडतील. याआधी भारतीय संघ बराच मेहनत घेत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह इतर भारतीय फलंदाजांनीही नेटमध्ये भरपूर घाम गाळला, तर गोलंदाजांनीही आगामी सामन्याच्या तयारीत कोणतीही कसर सोडली नाही. पण टीम इंडियाच्या या सराव सत्रादरम्यान असे काही घडले ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या व्हिडीओद्वारे आयसीसीने कोहलीचा अपमान केल्याचा दावा त्याच्या चाहत्यांचा आहे. काय आहे प्रकरण ?

ICC ने केला विराटचा अपमान ?

आयसीसीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये भारतीय खेळाडू जोरदार सराव करताना दिसत आहेत.Hard yards put in at the nets by Rohit Sharma and Mohammed Shami 👊 – अशी कॅप्शनही या व्हिडीओसबत टाकण्यात आली होती. शमीने त्याच्या गोलंदाजीने रोहित शर्माला थोडं सतावलं, तर विराट कोहली हा थेट बोल्डचा झाला. पण त्यानंतर रोहित शर्मा काही शानदार शॉट्स खेळतानाही दिसला. विराटला मात्र त्यात फारसं यश आलं नाही. एकीकडे रोहित सटासट शॉट्स मारताना दिसला तर कोहली मात्र आईट होताना व्हिडीओत दिस ला. यावरूनच आता वेगळ्याच चर्चेचं युद्धे छेडलं गेलं आहे. भारतीय कर्णाधारासमोर विराट कोहलीचा अपमान करण्याचा हेतू असल्याचा दावा करण्यात येत आहे.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

पाकिस्तानविरोधात ठोकलं शतक

प्रॅक्टिस सेशनमध्ये शमीच्या गोलंदाजीवर विराट कोहली बोल्ड झाला असला तरी अलीकडेच त्याने पाकिस्तानविरुद्ध नाबाद शतक झळकावून अनेक विक्रम केले होते. त्याने 111 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी करत भारताला शानदार विजय मिळवून दिला.या खेळीसह विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला. त्याचबरोबर त्याने वनडेमध्ये सर्वात जलद 14 हजार धावाही पूर्ण केल्या होत्या.

300 वा वनडे सामना खेळणार कोहली

विराट कोहली रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळेल तेव्हा त्याच्या नावावर आणखी एक खास कामगिरी नोंदवली जाईल. विराटने आतापर्यंत 299 वनडे सामने खेळले असून उद्या तो 300 वा वनडे खेळणार आहे. 300 वा वनडे सामना खेळणारा विराट हा सातवा भारतीय खेळाडू ठरणार आहे. त्याच्या आधी राहुल द्रविड, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांनी ही कामगिरी केली. तर एकंदरीत ही कामगिरी करणारा तो 22 वा क्रिकेटपटू ठरणार आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.