INDvsPAK : भारत-पाक सामन्यादरम्यान सट्टाबाजार 100 कोटींच्या पार

आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज (16 जून) मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यादरम्यान सट्टा बाजारात मोठी उलाढाल होणार आहे. सध्या या सामन्यावरील सट्टा 100 कोटींच्या पार गेला आहे.

INDvsPAK : भारत-पाक सामन्यादरम्यान सट्टाबाजार 100 कोटींच्या पार

नवी दिल्ली : आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज (16 जून) मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याची प्रतिक्षा दोन्ही देशातीन क्रिकेट प्रेमींना होती. त्यासोबतच सट्टेबाजही या सामन्याची तितकीच वाट पाहत होते. या सामन्यावर दिल्ली एनसीआरमध्ये सट्टा बाजार 100 कोटींच्या पार गेला आहे. फरीदाबाद, गाजियाबाद, नोएडा आणि गुरुग्राम सारख्या दिल्ली जवळील परिसरांमध्ये सट्टेबाजांचं मजबूत नेटवर्क असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.

“रविवारी भारत-पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सामन्यादरम्यान आमची सट्टेबाजांवर करडी नजर असणार आहे.  पंचतारांकित हॉटेल, गेस्ट हाऊस, करोल बाग आणि जुनी दिल्ली या परिसरांवर आमची नजर राहणार आहे. कारण, या परिसरांमध्ये मोठे सट्टेबाज राहू शकतात. या सट्टेबाजांचं नेटवर्क खूप मजबूत असतं, त्यामुळे यांना पकडणं अत्यंत कठीण असतं. पण आम्ही आमचं काम करु”, असं पोलीस उपायुक्त मधुर वर्मा यांनी सांगितलं.

भारत-पाकिस्तान सामन्यात सट्टाबाजारात भारताचं पारडं जड आहे. सट्टा हा फक्त सामन्याच्या परिणामांवर नाही तर एक-एक षटकावर, एक-एक चेंडूवर अवलंबून असतं. कोण किती धावा काढणार, कोण किती विकेट घेणार यावरही सट्टा लागत असतो.

“आयपीएल सामन्यांप्रमाणेच या विश्वचषकातही कॉलेजचे विद्यार्थी, उद्योगपती, हॉटेल मालक, क्रिकेट प्रशंसक, व्यापारी, कॉरपोरेट महिला, हवाला व्यापारी आमच्यासोबत आहेत. 60 टक्क्याहून जास्त पैसे भारताच्या विजयावर लावण्यात आले आहेत”, अशी माहिती एका सट्टेबाजाने न आयएएनएस वृत्तसंस्थेला दिली.

भारतीय खेळाडूंवर किंमत लावली जात आहे. उदाहरणार्थ, जसप्रीत बुमराहसाठी 18 रुपये आणि मोहम्मद आमीरसाठी 6 रुपये. तसेच फलंदाजांवरही त्यांच्या धावांनुसार सट्टा लावला जात आहे. कोण अर्धशतक ठोकणार, कोण शतक ठोकणार, खोण कधी बाद होणार या सर्वांवर सट्टा लावला जात आहे.

संबंधित बातम्या :

INDvsPAK : मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफोर्ड मैदान भारतासाठी लकी?

World Cup : आम्ही कुणालाही पराभूत करु शकतो : विराट कोहली

World Cup : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात ‘या’ 5 खेळाडूंमध्ये खरी टक्कर

World Cup : भारत-पाकिस्तान सामनाही पावसात वाहून जाणार?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *