World Test Championship final 2021 : निवड समितीवर आक्षेप नोंदवणारे हे 4 सवाल, फॅन्स विचारतायत या प्रश्नांची उत्तरं

ICC World Test Championship final 2021 : निवड समितीने संघाची घोषणा केली खरी पण या निवडीवर क्रिकेट फॅन्स काही आक्षेप नोंदवत आहेत. नोंदवलेल्या आक्षेपांपैकी 4 महत्त्वाचे आक्षेप ज्यांची उत्तरं बीसीसीआयच्या जबाबदार अधिकाऱ्याला द्यावी लागतील

World Test Championship final 2021 : निवड समितीवर आक्षेप नोंदवणारे हे 4 सवाल, फॅन्स विचारतायत या प्रश्नांची उत्तरं
बीसीसीआय
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 7:53 AM

मुंबई :  जून महिन्यात टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 चा अंतिम सामन्यासाठी (ICC World Test Championship Final) तसंच इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटींसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने 20 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. निवड समितीने संघाची घोषणा केली खरी पण या निवडीवर क्रिकेट फॅन्स काही आक्षेप नोंदवत आहेत. नोंदवलेल्या आक्षेपांपैकी 4 महत्त्वाचे आक्षेप ज्यांची उत्तरं बीसीसीआयच्या जबाबदार अधिकाऱ्याला द्यावी लागतील कारण आक्षेपही तसेच महत्त्वाचे आहेत. (ICC World Test Championship final 2021 Cricket Fans Ask 4 Big Question to Selecter After selected Team India)

1. संघात जास्त खेळाडूंचा भरणा का नाही?

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटींसाठी निवड समितीने 20 सदस्यीय संघाची घोषणा केल्यापासून क्रिकेट फॅन्स हा मुलभूत प्रश्न विचारत आहेत की एवढी मोठी टूर असताना संघात 20 च खेळाडू का? संघात जास्त खेळाडूंचा भरणा का नाही. सध्या कोरोनाचं रौद्र रुप सगळीकडे पाहायला मिळतंय. कोरोनाची वक्रदृष्टी जगावर पडलीय. अशा परिस्थितीत दौऱ्यावर असताना जर काही समस्या निर्माण झाली किंबहुना संघातील कुणाला कोरोनाची लागण झाली, तर भारतीय संघाकडे अधिकचे पर्याय आहेत का? असे सवाल क्रिकेट फॅन्स उपस्थित करत आहेत.

2. पृथ्वी शॉ ला संघातून का वगळलं?

पृथ्वी शॉ ची आयपीएलमधील कामगिरी डोळ्यात भरणारी आहे. त्याने आयपीएलमध्ये चमकदार परफॉर्मन्स दिलाय. त्याने आयपीएलच्या 7 मॅचेसमध्ये 308 धावा ठोकून आयसीसी वर्ल्ड चॅम्पियन्सशीपसाठी दावेदारी केली होती. परंतु निवड समितीने त्याच्या दमदार परफॉर्मन्सकडे साफ दुर्लक्ष केलं. विजय हजारे क्रिकेट स्पर्धेत द्विशतक तसंच आयपीएलमध्ये धमाकेदार खेळी करुनही पृथ्वीला न्याय मिळाला नाही, अशी खंत क्रिकेट फॅन्सना आहे.

3. संघात तिसरा विकेटकीपर का नाही?

निवड समितीने रिषभ पंत आणि ऋद्धिमान साहा यांचा संघात विकेट किपर म्हणून समावेश केलाय. पण ऋद्धिमान साहाला फिटनेस टेस्ट पास करुन इंग्लंडचं तिकीट मिळणार आहे. अशा परिस्थितीत संघात तिसरा विकेटकीपर का समाविष्ट केला गेला नाही? असा महत्त्वाचा सवाल क्रिकेट फॅन्सने उपस्थित केलाय.

4. भुवनेश्वर कुमार संघात का नाही?

सगळ्यांना माहिती आहे की भुवनेश्वर कुमारकडे कोणत्याही क्षणी विकेट घेण्याची क्षमता आहे. तसंच आपल्या स्विंगने तो भल्या भल्या बॅट्समनची भंबेरी उडवतो. मग इंग्लंडमधलं हवामान तर वेगवान गोलंदाजांना अनुकुल असताना भुवनेश्वर कुमारची संघात निवड का केली नाही, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

(ICC World Test Championship final 2021 Cricket Fans Ask 4 Big Question to Selecter After selected Team India)

हे ही वाचा :

World Test Championship final 2021 : भारतीय संघात जागा मिळवून अर्जन नागवासवालाने रचला इतिहास, 46 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं!

World Test Championship final 2021 | निवड समितीने ‘या’ 2 कारणांचा विचार केला अन् हार्दिक पांड्याला संघातून डच्चू दिला!

Test Championship final 2021 | धावांचा पाऊस पाडणाऱ्या के एल राहुलने टेन्शन वाढवलं, Playing 11 मध्ये कुणाला संधी?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.