AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Test Championship final 2021 | धावांचा पाऊस पाडणाऱ्या के एल राहुलने टेन्शन वाढवलं, Playing 11 मध्ये कुणाला संधी?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (ICC World Test Championship 2021) आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी केएल राहुलला (KL Rahul) संधी देण्यात आली आहे. मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये (Team India playing XI) खेळण्यासाठी केएलला फिटनेस (fitness test) द्यावी लागणार आहे.

Test Championship final 2021 | धावांचा पाऊस पाडणाऱ्या के एल राहुलने टेन्शन वाढवलं, Playing 11 मध्ये कुणाला संधी?
के एल राहुल
| Updated on: May 08, 2021 | 12:03 AM
Share

लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (World Test Championship final 2021) आणि इंग्लंड विरुद्धच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने (Bcci) राखीव खेळाडूंसह एकूण 24 सदस्यीय तगड्या संघाची घोषणा केली. यामध्ये (Mayank Agarwal) मयंक अग्रवाल, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल (Shubaman Gill) यांना सलामीवीर म्हणून संधी देण्यात आली आहे. यासोबत केएल राहुलचा देखील समावेश करण्यात आला आहे. मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी फिटनेस टेस्ट पास करावी लागणार आहे. मात्र टीम इंडियाच्या गोटात राहुलला संधी मिळाल्याने त्याने या सलामीवीर तिकडी सोबतच प्लेइंग इलेव्हनचं टेन्शन वाढवलं आहे. ( ICC World Test Championship 2021 final KL Rahul will have to undergo a fitness test to play in Team India playing XI)

केएलची शानदार कामगिरी

केएल राहुल आयपीएलच्या 13 व्या मोसमापासून शानदार फॉर्मात आहे. केएलने नुकत्याच इंग्लंड विरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत शानदार शतक झळकावंल. तसेच त्यानंतर आयपीएलच्या 14 व्या मोसमात त्याने धमाका केला. केएलने 14 व्या मोसमात पंजाब किंग्सच्या नेतृत्वासह 7 सामन्यात 4 अर्धशतकांसह 331 धावा चोपल्या. नाबाद 91 धावा ही त्याची या पर्वातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली.

त्यानंतर केएलच्या पोटात वेदना सुरु झाल्या. केएलवर प्राथमिक वैद्यकीय उपचार करण्यात आले. मात्र त्यानंतरही वेदना थांबत नव्हत्या. यामुळे केएलची पुढील तपासणी करण्यात आली. त्यात त्याला अ‌ॅपेंडिक्स असल्याचं निदान झालं. यामुळे केएलला 14 व्या मोसमाला मुकावे लागले. दरम्यान आता केएलला संधी मिळाली आहे. केएलसमोर फिटनेस टेस्टचा अडसर आहे. मात्र जर केएलला खेळवायचं झालं तर कोणाला विश्रांती द्यायची, असा यक्ष प्रश्न टीम मॅनेजमेंटसमोर उभा राहिला आहे. यामुळे एका प्रकारे केएलने टीम मॅनेजमेंटची डोकेदुखी वाढवली आहे. तसेच केएल रोहित आणि मयंकचंही टेन्शन वाढलं आहे.

केएलला संधी दिल्यास डच्चू कोणाला?

शुबमन गिल आणि रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामिगिरी केली. शुभमनने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीत 91 धावांची निर्णायक खेळी केली होती. तर रोहितने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शानदार 161 धावांची खेळी केली होती. या दोघांच्या तुलनेत मयंत अग्रवाल हा सातत्याने संधी मिळूनही अपयशी ठरतोय. यामुळे संघात केएलला संधी दिल्यास मयंकला डच्चू देण्यात येईल, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा (फिटनेस टेस्ट आवश्यक)

संबंधित बातम्या :

World Test Championship Final 2021 | जागतिक कसोटीचं आव्हान, इंग्लंडच्या वेगवान खेळपट्टीवर भारताकडून सलामीला कोण उतरणार?

World Test Championship Final 2021 | रवींद्र जाडेजा ते अक्षर पटेल फिरकीच्या जोडीला बुमराह-ईशांतचं वेगवान अस्त्र, भारताचा गोलंदाजांचा ताफा कसा?

(ICC World Test Championship 2021 final KL Rahul will have to undergo a fitness test to play in Team India playing XI)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.