AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Aus: एक मिनिटाच्या VIDEO मध्ये रवींद्र जडेजाचा धुमाकूळ, 4 चेंडूत ठोकल्या 18 धावा

भारतीय संघाने शेवटच्या 5 षटकांमध्ये 76 धावा केल्या. रवींद्र जडेजाने सीन एबॉटच्या (Sean Abbott) 48 व्या षटकात सलग तीन चौकार आणि एक षटकार ठाकले.

Ind vs Aus: एक मिनिटाच्या VIDEO मध्ये रवींद्र जडेजाचा धुमाकूळ, 4 चेंडूत ठोकल्या 18 धावा
| Edited By: | Updated on: Dec 03, 2020 | 12:21 PM
Share

नवी दिल्ली (Ind vs Aus) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना (India Vs Australia 3rd ODI) कॅनबेरामध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 302 धावा केल्या. अखेरीस हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) चौकार आणि षटकार लगावले आणि सामन्याची रंगत वाढवली. भारतीय संघाने शेवटच्या 5 षटकांमध्ये 76 धावा केल्या. रवींद्र जडेजाने सीन एबॉटच्या (Sean Abbott) 48 व्या षटकात सलग तीन चौकार आणि एक षटकार ठाकले. त्याच्या या धमाकेदार शॉट्सचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. (ind vs aus 3rd odi viral video of ravindra jadeja smashes 18 run in 4 ball)

भारतीय संघाने 47 षटकांमध्ये 5 गडी गमावून 260 धावा केल्या होत्या. अखेरच्या तीन षटकांत भारताला मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती. जेणेकरून ऑस्ट्रेलियासमोर मोठ्या धावांचं टार्गेट करता येईल. एरॉन फिंचने सीन एबॉटला ओव्हर दिलं. यात पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्याने एक रन काढला तर रवींद्र जडेजाने सलग तीन चौकार ठोकले आणि त्यानंतर आणखी एक षटकार ठोकला.

खरंतर, सामन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाने फार काही खास सुरुवात नाही केली. सुरुवातीला शिखर धवनने विकेट गमावल्यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिल काही वेळच मैदानावर टिकले. त्यानंतर गिल बाद झाला. यावेळी विराट कोहली क्रीजवर कायम राहिला खरा पण दुसर्‍या बाजूला विकेट्स पडत गेल्या.

या रंगतदार सामन्यात 150 धावांवर भारताचे 5 विकेट पडले. यानंतर अखेर हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजाने सामना खिशात घातला असं म्हणायला हरकत नाही. यामुळेच भारतीय संघाने धावसंख्या 302 पर्यंत खेचली. या सामन्यात हार्दिक पांड्याने 92 आणि जडेजाने 66 धावा केल्या.

इतर बातम्या – 

India vs Australia 2020 | सलग 2 पराभव, तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता

India vs Australia 2020 | विराटवर कर्णधार पदाचा कोणताही दबाव नाही, सलग दुसऱ्या पराभवानंतर टीकेचा धनी झालेल्या कोहलीची हरभजनकडून पाठराखण

(ind vs aus 3rd odi viral video of ravindra jadeja smashes 18 run in 4 ball)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.