INDIA TOUR AUSTRALIA | चेतेश्वर पुजारा सहजा-सहजी धावा करुच शकणार नाही, ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने डिवचलं

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

INDIA TOUR AUSTRALIA | चेतेश्वर पुजारा सहजा-सहजी धावा करुच शकणार नाही, ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने डिवचलं

सिडनी : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला (India Tour Australia) 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होतेय. एकदिवसीय मालिकेपासून या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या एकदिवसीय दौऱ्यानंतर अनुक्रमे टी 20 आणि कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चेतेश्वर पुजारा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. चेतेश्वर पुजाराने या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 500 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. मात्र यंदा चेतेश्वर सहजासहजी धावा करुच शकणार नाही, असं म्हणत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने डिवचलं आहे. ind vs aus it will be difficult for cheteshwar pujara to big score this time, said former australia bowler glenn mcgrath

मॅक्रगा काय म्हणाला?

“मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात काही गोष्टी या पुजाराच्या बाजूने गेल्या. पण यावेळेस असं होणार नाही. पुजारा खूप काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. त्याने मैदानात खूप कमी वेळ घालवला आहे. अशात पुजाराला यावेळेस धावा करण्यासाठी कठोर मेहनत आणि संघर्ष करावा लागणार आहे”, असं मॅकग्रा म्हणाला.

कौतुकाचा वर्षाव

मॅकग्राने पुजाराचं कौतुकही केलं. “धावा न केल्यानं अनेक फलंदाज दबावात येतात. मात्र पुजारा त्यातला नाही. या स्वभावामुळे, शेवटच्या दौर्‍यावर त्याला मदत झाली. ज्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला, असंही मॅकग्राने नमूद केलं.

अखेरचा सामना मार्चमध्ये

पुजाराने अखेरचा सामना 3 मार्चला खेळला होता. हा रणजीमधील अंतिम सामना सौराष्ट्र विरुद्ध बंगाल यांच्यात खेळण्यात आला होता. या अंतिम सामन्यात सौराष्ट्रने बंगालवर मात केली होती.

“डे नाईट टेस्टमध्ये पेसरना मदत मिळेल”

एडिलेडमध्ये होणाऱ्या ऐतिहासिक कसोटी सामन्याबाबत मॅकग्राने विधान केलं आहे. “हा सामना फार मजेशीर असणार आहे. या सामन्यात खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल. टीम इंडियाच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांना याचा फायदा मिळेल. कारण ऑस्ट्रेलियाकडे डावखुरे वेगवान गोलंदाज आहेत. जे की सामन्यावर आपल्या गोलंदाजीने प्रभाव मिळवू शकतात”, असं मॅक्रगा म्हणाला.

पुजाराची मागील दौऱ्यातील कामगिरी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील दौर्‍यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 च्या फरकाने पराभव केला होता. अशा प्रकारे टीम इंडियाने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. चेतेश्वर पुजारा हा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. पुजारने त्यावेळेस 74..47 च्या सरासरीने 521 धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलिया टेस्ट टीम : टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स (उप कर्णधार), सीन एबोट, जो बर्न्स, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, नॅथन लियोन, मायकल नासिर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, मॅथ्यू वेड आणि डेव्हिड वार्नर .

भारतीय कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अ‌ॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अ‌ॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन भूमीवर विजय कसा मिळवायचा, हे आम्हाला चांगलंच माहितीय, चेतेश्वर पुजाराने कांगारुंना ललकारले

IND vs AUS : त्यांच्याकडे वॉर्नर-स्मिथ तर आपल्याकडेही बुमराह-शमी आहेत, पुजाराने कांगारुंना ललकारले

ind vs aus it will be difficult for cheteshwar pujara to big score this time, said former australia bowler glenn mcgrath

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI