IND vs AUS : विराटच्या अनुपस्थितीत रहाणेऐवजी रोहितला कर्णधार करा; इरफान पठाणचा सल्ला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यात कर्णधार विराट कोहली खेळणार नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे संघाचं नेतृत्व करणार आहे.

IND vs AUS : विराटच्या अनुपस्थितीत रहाणेऐवजी रोहितला कर्णधार करा; इरफान पठाणचा सल्ला
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 11:04 PM

दुबई : आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2020) समाप्तीनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour Australia) जाणार आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या तिन्ही मालिकांसाठी काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. टीम इंडिया टी 20, एकदिवसीय मालिकेनंतर 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यात कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खेळणार नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे संघाचं नेतृत्व करणार आहे. याबाबत टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाणने बीसीसीआयला वेगळाच सल्ला दिला आहे.

इरफान पठाण म्हणाला की, कोहलीच्या गैरहजेरीचा भारतीय संघाला मोठा फटका बसू शकतो. विराटची जागा घेणं कोणत्याही खेळाडूसाठी अवघड गोष्ट आहे. गेल्या काही वर्षातील त्याचा परफॉर्मन्स पाहिल्यावर ही बाब सहज लक्षात येईल. त्यामुळे कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबादारी द्यायला हवी. मी रहाणेला विरोध करत नाही, परंतु रोहितने कर्णधार व्हायला हवं. एक कर्णधार म्हणून रोहितने स्वतःला सिद्ध केलं आहे.

पठाण म्हणाला की, तुम्ही 2008 ची ऑस्ट्रेलियामधील एकदिवसीय मालिका आठवून पाहा. तेव्हा रोहित संघात नवीन होता. परंतु ऑस्ट्रेलियन मैदानांवर त्याने जबरदस्त खेळ दाखवला होता. रोहित नुकताच दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे आता तो स्वतःला सिद्ध करु पाहतोय, अशा वेळी त्याला संधी द्यायला हवी.

इरफान म्हणाला की, रोहितची धावांची भूक ही विरोधी संघासाठी धोकादायक बाब आहे. परदेशी खेळपट्ट्यांवर खेळणं अवघड असतं. परंतु रोहित जेव्हा फॉर्ममध्ये असतो, तेव्हा त्याला रोखणं हे सर्वात कठीण काम आहे. 2004 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी विरेंद्र सेहवागने भारतीय संघासाठी जी भूमिका निभावली होती, अगदी तशीच भूमिका आत्ता रोहित निभावेल, यात कोणतीही शंका नाही.

कसोटी मालिकेदरम्यान ‘या’ कारणामुळे कर्णधार कोहली मायदेशी परतणार

विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गर्भवती आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात अनुष्का शर्मा आणि विराट आई-बाबा होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विराटने बीसीसीआयकडे पॅटनिर्टी लिव्हसाठी अर्ज केला होता. बीसीसीआयने विराटची रजा मंजूर केली आहे. त्यामुळे विराट टीम इंडियासाठी तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत खेळताना दिसणार नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत एकूण 4 सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेतील दुसरा, तिसरा आणि चौथा सामना अनुक्रमे 26 डिसेंबर, 7 आणि 15 जानेवारी 2020 ला खेळण्यात येणार आहे. विराटच्या घरी या कालावधी दरम्यान नवीन पाहुणा येणार असल्याने विराटने शेवटच्या 3 कसोटीतून माघार घेतली आहे.

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या

India Tour Australia | ठरलं! अखेर हिटमॅन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार, पण….

IND vs AUS: एकही सामना न खेळता वरुण चक्रवर्ती भारतीय संघाबाहेर, वरुणच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त

(IND vs AUS Test series : Irfan Pathan wants Rohit sharma to captain not Ajinkya rahane in absence of Virat Kohli)

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.