AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का, 'हा' खेळाडू दुखापतग्रस्त
| Updated on: Nov 09, 2020 | 12:11 AM
Share

अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमाच्या समाप्तीनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour Australia) जाणार आहे. या दौऱ्याआधी टीम इंडियाचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. मात्र यानंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का लागला आहे. ऋद्धीमान साहाला (wriddhiman saha) हॅमस्ट्रिंग दुखापत झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. आयपीएलमध्ये ऋद्धीमान साहा सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळतोय. प्लेऑफच्या दुसऱ्या सामन्यातील टॉसदरम्यान कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ऋद्धीमानच्या दुखापतीबाबात माहिती दिली. “ऋद्धीमान अजून दुखापतीतून सावरला नाहीये. त्याला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली आहे”, अशी माहिती वॉर्नरने दिली. म्हणजेच ऋद्धीमानच्या गुडघ्यामागील स्नायूंना दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे ऋद्धीमानला एलिमिनेटर सामन्याला मुकावे लागले होते.team india riddhiman saha suffers hamstring injury

ऋद्धीमानला जर दुखापतीमुळे कसोटी सामन्याला मुकावे लागले, तर त्याजागी ऋषभ पंतला पर्यायी विकेटकीपर म्हणून संघात स्थान मिळू शकते,अशी चर्चाही आहे. मात्र याबाबत अजूनही कोणतीही औपाचारिक माहिती देण्यात आलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

ऋद्धीमानच्या आधी टीम इंडियाचे स्टार गोलंदाज इशांत शर्मा आणि भुवेश्वर कुमार या दोघांनाही दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे या दोघांची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नाही. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 टी 20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. यानंतर कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या 2 म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीतून विराट कोहली माघार घेणार असल्याची चर्चा आहे. विराटच्या घरी जानेवारी महिन्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. यामुळे विराट या मालिकेतील शेवटच्या 2 सामन्यातून माघार घेणार असल्याची चर्चा आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे मालिकानिहाय वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

एकदिवसीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

टी-20 सीरिजसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), शिखर, मयांक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर आणि वरुण चक्रवर्ती

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

असा आहे कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज

संबंधित बातम्या :

India Tour Australia | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या 2 सामन्यात विराट खेळणार नाही?

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर

team india riddhiman saha suffers hamstring injury

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.