AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG 2nd ODI ची वेळ बदलली, टीम इंडियाचा कॅप्टनही बदलला जाणार, अचानक असं होण्यामागचं कारण काय?

भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका सुरु असून या मालिकेतील पहिला सामना काल रंगला आता दुसरा सामना उद्या रंगणार आहे. या सामन्याची वेळ बदलली आहे तर कर्णधारही बदलला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

IND vs ENG 2nd ODI ची वेळ बदलली, टीम इंडियाचा कॅप्टनही बदलला जाणार, अचानक असं होण्यामागचं कारण काय?
ind vs eng 2nd odi
| Updated on: Jul 15, 2026 | 11:59 AM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. टीम इंडियाने टी-20 मालिका गमावली असली तरीही वनडे मालिकेची सुरुवात गोड केली आहे. टीम इंडियाने पहिला सामना सहज जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना उद्या रंगणार आहे. या सामन्याची वेळ तर बदलली आहे पण संघाचा कर्णधारही बदलला जाईल. भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात नवीन कर्णधाराच्या नेतृत्वात मैदानात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आता, भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याची वेळ बदलली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू झाला, जो इंग्लंडमध्ये दिवसाचा सामना होता. दुसरा एकदिवसीय सामना इंग्लंडमध्ये सामना दुपारी 12 वाजता सुरू होईल, तर भारतात पहिला चेंडू सायंकाळी 5:30 वाजता टाकला जाईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना कार्डिफ येथे खेळला जाईल आणि टीम इंडिया हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना सायंकाळी 5:30 वाजता सुरू होईल आणि जर सामना पूर्ण 50 षटकांपर्यंत खेळला गेला, तर तो रात्री 1 वाजण्याच्या सुमारास संपण्याची शक्यता आहे. सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल, तर जिओस्टार ॲपवर ऑनलाइन स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. त्यामुळे, हा सामना सोनी टीव्हीवर आणि जिओस्टारच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.

आता दुसऱ्या सामन्याचे वेळापत्रक जसे बदलले आहे तसे आता कर्णधारही बदलला जाईल. कालच्या सामन्यात कर्णधार शुभमन गिलला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला सामन्यात खेळी थांबवून मैदान सोडावे लागले. गिल 80 धावांवर रिटायर्ड बाद झाला. त्यामुळे पुढील सामना लगेचच उद्या असल्यामुळे गिल खेळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. जर गिल कर्णधार म्हणून मैदानावर उतरला नाही तर श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्त्व सांभाळताना दिसेल. यासोबतच गुरनुर ब्रारही दुखापतग्रस्त आहे. या दोन्ही खेळाडूंबाबत बीसीसीआय काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप