‘साहेब’ 9 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करतील, इंग्लंडच्या माजी प्रशिक्षकांनी भारताला डिवचलं!

इंग्लंडचा संघ टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतात पोहोचतो ना पोहोचतो तोच इंग्लंडचे माजी मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी भारताला डिवचलं आहे.

'साहेब' 9 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करतील, इंग्लंडच्या माजी प्रशिक्षकांनी भारताला डिवचलं!
England Former Coach andy Flower
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 8:18 AM

नवी दिल्लीइंग्लंडचा संघ (Team England) टीम इंडियाविरुद्धच्या (Team India) कसोटी मालिकेसाठी (Eng Vs Ind test match Series) भारतात पोहोचतो ना पोहोचतो तोच इंग्लंडचे माजी मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी भारताला डिवचलं आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत बहारदार प्रदर्शन करण्यास टीम इंग्लंड सज्ज असून इंग्लंड भारतीय भूमीवरचा 9 वर्षांपूर्वी तो विक्रम पुन्हा करेल, असा विश्वास फ्लॉवर यांनी व्यक्त केलाय. (Ind Vs Eng Former Coach Andy Flower Predict Ind Vs Eng test Series)

इंग्लंडने भारतीय भूमीवर भारतालाच 2012 साली पराभवाची धूळ चाखायला लावली होती. इंग्लंडच्या या ऐतिहासिक कामगिरीपाठीमागे पूर्व प्रशिक्षक म्हणून अँडी फ्लॉवर यांचा महत्त्वाचा वाटा आहे. याच विजयाची पुनरावृत्ती इंग्लंडचा संघ करु शकतो कारण यावेळीही टीममध्ये अव्वल खेळांडूंचा भरणा आहे, असं मत फ्लॉवर यांनी मांडलं आहे.

इंग्लंडच्या 2012 च्या विजयामध्ये ग्रॅमी स्वान आणि माँटी पनेसर या दोन्ही फिरकी गोलंदाजांनी आणि स्टार फलंदाज केविन पीटरसन याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गेल्या दहा दशकातील भारतीय भूमीवरील परदेशी संघातल्या मालिकेतला हा एकमेव विजय आहे.

झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि इंग्लंडचा सर्वात यशस्वी प्रशिक्षक असलेल्या फ्लावर्सने आगामी मालिकेविषयी भविष्यवाणी केलेली नसली तरी इंग्लंडचा संघात क्षमता असल्याने तसंच चांगल्या खेळाडूंचा भरणा असल्याने तो मालिकेत चांगले प्रदर्शन करेल, असं ते म्हणाले.

येत्या 5 फेब्रुवारीपासून चेन्नई येथे सुरू होणार्‍या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोणत्या संघाला विजयाचा दावेदार मानतात, असे फ्लॉवर्स यांना विचारले असता, त्यांनी कोणत्याही एका संघाचे नाव घेतले नाही. ते म्हणाला, “कोणता संघ वरचढ ठरेल, हे आताच सांगता येत नाही. कदाचित ते घाईचं ठरेल परंतु इंग्लंड संघात मजबूत खेळाडूंचा चांगला मिलाफ आहे जो चांगला खेळ करण्यास उत्सुक आहे.”

दरम्यान, इंग्लंडचा संघ टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतात पोहोचला आहे. भारतातल्या आगमनाचा व्हिडिओ इंग्लंड टीमच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये संघाचे सर्व खेळाडू चेन्नईतील हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधात तर इंग्लंडने श्रीलंकेविरोधात त्यांच्याच भूमित कसोटी मालिकेत शानदार विजय मिळवला. यामुळे इंग्लंड आणि टीम इंडियाचा विश्वास दुणावला आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

हे ही वाचा :

IND vs ENG : पाहुणे आले…. कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाचं भारतात आगमन

#INDvsENG | टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा

England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.