AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने, पाकच्या संघाला भारतात यावं लागणार

IND vs PAK: नुकताच भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपमधील सामना रंगला, आता पुन्हा भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध रंगणार आहे.

| Updated on: Sep 15, 2026 | 2:11 PM
Share
जेव्हा जेव्हा भारतीय आणि पाकिस्तानी संघ मैदानावर एकमेकांसमोर येतात, तेव्हा सामन्याची उत्सुकता अनेक पटींनी वाढते. अलीकडेच, एसीसी महिला आशिया कप २०२६ मध्ये हे दोन संघ एकमेकांसमोर आले होते.

1 / 5
आता, हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा हॉकीच्या मैदानावर आमनेसामने येणार आहेत. विशेष म्हणजे, या दोन संघांमधील हा सामना भारतीय भूमीवर होणार आहे.

2 / 5
पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ ही स्पर्धा २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान पंजाबमध्ये होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जाहीर केले. हॉकी इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, यजमान आणि गतविजेता भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, दक्षिण कोरिया, मलेशिया, चीन आणि जपानचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ओमान आणि बांगलादेश यांना राखीव संघ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

3 / 5
स्पर्धेचे सामने पंजाबमधील दोन शहरांमध्ये खेळले जातील. प्राथमिक सामने जालंधर येथील ऑलिम्पियन सुरजित सिंग हॉकी स्टेडियममध्ये, तर बाद फेरीचे सामने मोहाली येथील ऑलिम्पियन बलबीर सिंग सिनियर इंटरनॅशनल हॉकी स्टेडियममध्ये खेळले जातील. गट फेरीचे सामने २ नोव्हेंबरपर्यंत जालंधरमध्ये होतील आणि उद्घाटन सोहळाही तिथेच आयोजित केला जाईल. यानंतर, उपांत्य फेरीचे सामने ४ नोव्हेंबर रोजी आणि अंतिम सामना ५ नोव्हेंबर रोजी मोहालीमध्ये होतील.

4 / 5
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना १ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दोन्ही देशांमधील हॉकीतील तीव्र स्पर्धा पाहता, संपूर्ण आशियातील हॉकी चाहते हा सामना बारकाईने पाहत असतील. PHF देखील या सामन्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निवेदन जारी केले आहे. १४ सप्टेंबर रोजी, पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष मोहिउद्दीन अहमद वानी यांनी सांगितले की, पाकिस्तान संघाचा भारत दौरा सरकारच्या मंजुरीवर अवलंबून असेल. त्यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात सरकारकडून जे निर्देश दिले जातील, त्यानुसार फेडरेशन कार्यवाही करेल.

5 / 5
Follow Us
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपचा पलटवार!
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले यांचे मोठे विधान
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...