AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Pak T20 World Cup : टीम इंडियाने केला विजयाचा श्रीगणेशा, पाकिस्तानला चारली पराभवाची धूळ

वर्ल्ड कपमधील टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर मात करत स्पर्धेत विजयी सलामी दिली.

Ind vs Pak T20 World Cup : टीम इंडियाने केला विजयाचा श्रीगणेशा, पाकिस्तानला चारली पराभवाची धूळ
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 12, 2023 | 11:39 PM
Share

केपटाऊन : वर्ल्ड कपमधील टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या दोन कट्टर संघामध्ये न्यूलँड केपटाऊन इथे सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर मात करत स्पर्धेत विजय सलामी दिली. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाने हे आव्हान 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाकडून जेमिमा रॉड्रिग्जने सर्वाधिक 53 धावा केल्या. पहिला सामना जिंकत भारताने विजयाने मिशन वर्ल्ड कपची सुरूवात केली.

पाकिस्तान संघाने दिलेल्या 150 धावांचा पाठालाग करताना भारतीय संघाने सावध सुरूवात केली होती.  यास्तिका भाटिया बाद झाल्यावर जेमिमा रॉड्रिग्जने मैदानावर अखेरपर्यंत थांबत संघाला विजय मिळवून दिला. शफाली वर्मा बाद झाल्यावर कर्णधार हरमनप्रीत मैदानावर आली.

जेमिमा आणि हरमनप्रीत यांनी विजयाचा पाया रचला. दोघींची भागीदारी महत्त्वाची ठरली. मात्र मोठा शॉट मारण्याचा नादात हरमनप्रीत 33 धावांवर बाद  झाली. त्यानंतर भारतावर दबाव झालेला दिसत होता. मात्र युवा रिचा घोषने 18 ओव्हरमध्ये सलग तीन चौकार मारत पुन्हा सामना भारताच्या बाजुने झुकवला.

रिचाने 20 बॉलमध्ये 31 धावांची खेळी केली. यामध्ये तिने पाच चौकार मारले. दुसरीकडे जेमिमाने 38 बॉलमध्ये 53 धावांची विजयी खेळी केली. संयम ठेवत जेमिमाने हरमनप्रीत कौर आणि रिचासोबत भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानची सुरूवात निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकामध्ये दीप्ती शर्माने सलामीवीर जवेरिया खानला 8 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार बिस्माहने मैदानावर तळ ठोकला. मुनीबा अलीला 12 धावांवर राधा यादवने माघारी पाठवलं. चौथ्या नंबरवर आलेल्या निदा दारला पूजा वस्त्राकरने भोपळाही फोडू दिला नाही.

सिद्रा अमीनही फार काही वेळ मैदानात टिकली नाही. राधा यादवने तिला 11 धावांवर बाद केलं, त्यानंतर आलेल्या आयशा नसीमने आक्रमक पवित्रा घेतला. आयशा आणि बिस्माह या जोडीने भारतीय गोलंदाजांचा घाम फोडला. बिस्माहने अर्धशतकी 68 धावांची महत्त्वाची खेळी केली. आयेशाने अवघ्या 25 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या. आयशा आणि बिस्माह यांच्या 47 बॉलच्या 81 धावांची भागीदारी करत संघाला 150 धावसंख्येपर्यंत पोहोचवलं होतं.

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड.

पाकिस्तानः बिस्माह मारूफ (कर्णधार), आलिया रियाझ, आयमान अन्वर, आयशा नसीम, ​​फातिमा सना, जवेरिया खान, मुनीबा अली, सदफ शम्स, नशरा संधू, निदा दार, ओमामा सोहेल, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज, तुबा हसन.

Follow Us
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा