IndvsAus : ऑस्ट्रेलियाची प्रथम फलंदाजी

India vs Australia 1st ODI हैदराबाद: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वन डे सामना हैदराबादमध्ये होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. याआधी झालेल्या दोन सामन्यांची टी 20 मालिका ऑस्ट्रेलियाने 2-0 ने जिंकली. त्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियानेच टॉस जिंकला होता. दरम्यान, टी 20 मालिका गमावल्यानंतर वन डे मालिकेची विजयी सुरुवात करण्याचा …

IndvsAus : ऑस्ट्रेलियाची प्रथम फलंदाजी

India vs Australia 1st ODI हैदराबाद: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वन डे सामना हैदराबादमध्ये होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. याआधी झालेल्या दोन सामन्यांची टी 20 मालिका ऑस्ट्रेलियाने 2-0 ने जिंकली. त्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियानेच टॉस जिंकला होता.

दरम्यान, टी 20 मालिका गमावल्यानंतर वन डे मालिकेची विजयी सुरुवात करण्याचा टीम इंडियाचा इरादा आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवनच सलामीला उतरतील. तर मधली फळी कर्णधार विराट कोहली, अंबाती रायुडू, केदार जाधव आणि महेंद्रसिंह धोनी सांभाळतील. आजच्या सामन्यात रवींद्र जाडेजाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विजय शंकर आणि रवींद्र जाडेजा हे दोन अष्टपैलू खेळाडू आजच्या सामन्यात खेळत आहेत. गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादवकडे असेल. त्यांना विजय, जाडेजा आणि केदार जाधवची साथ लाभेल.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात विशेष बदल केलेला नाही. विकेटकीपर अॅलेक्स कॅरीचा संघात समावेश करण्यात आला आहे. कर्णधार अॅरॉन फिंच आपला शंभरावा वन डे सामना आज खेळत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *