AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia 2020 | विराट फार आवेशात निर्णय घेतो, गंभीरनंतर आशिष नेहराची कर्णधार कोहलीवर टीका

गेल्या काही दिवसांपासून विराटवर टीका करण्यात येत आहे.

India vs Australia 2020 | विराट फार आवेशात निर्णय घेतो, गंभीरनंतर आशिष नेहराची कर्णधार कोहलीवर टीका
| Updated on: Dec 01, 2020 | 5:40 PM
Share

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर सलग दोन सामन्यात विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिकाही जिकंली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा (India Tour पहिल्या सामन्यात 66 तर दुसऱ्या सामन्यात 51 धावांनी पराभव केला. यामुळे ऑस्ट्रेलियाने 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या दोन्ही सामन्यात टीम इंडियाचे गोलंदाज अपयशी ठरले. तसेच कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. दरम्यान आता गौतम गंभीरनंतर टीम इंडियाचा माजी गोलंदाज आशिष नेहराने (Ashish Nehra) कर्णधार विराटवर टीका केली आहे. india vs australia 2020 former india bowler ashish nehra criticizes skipper virat kohli

विराट आवेशात येऊन निर्णय घेतो. तसेच विराटने दुसऱ्या सामन्यात गोलंदाजीमध्ये ऐनवेळेस अनपेक्षित बदल केले. यामुद्द्यावरुन नेहराने विराटवर निशाणा साधला. विराटने काही निर्णय हे फार घाईत घेतले, याचा काहीच फायदा झाला नाही, असं नेहरा म्हणाला. आशिष नेहरा क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बोलत होता.

नेहरा काय म्हणाला?

“दुसऱ्या सामन्यात विराटने मोहम्मद शमीला 2 ओव्हर गोलंदाजी करायला दिली. त्यानंतर विराटने नवदीप सैनीला बोलिंगसाठी बोलावलं. दुसऱ्या बाजूनं शमीने गोलंदाजी करावी, अशी इच्छा विराटची होती, हे मी समजू शकतो. परंतु विराटने सामन्याच्या सुरुवातीला यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहचा केवळ 2 ओव्हरसाठीच उपयोग का केला. विराट सातत्याने बोलिंगमध्ये बदल करतोय. विराटकडे गोलंदाजीसाठी केवळ 5 पर्यायच आहेत. विराटने मयंक अग्रवाल आणि हार्दिक पांड्यालाही गोलंदाजीची संधी दिली. मात्र हा निर्णय मैदानात घेतला गेला”, असं नेहरा म्हणाला.

“विराट निर्णय घेण्यास घाई करतोय”

“विराट घाईगडबडीत निर्णय घेतोय. पहिल्या सामन्यात कोहलीचा कॅच सोडला. यानंतरही विराट गडबडीत दिसला. विराटने आपल्या कारकिर्दीत अनेकदा 350 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. मोठ्या धावांचं पाठलाग करणं हे विराटसाठी नवं नाही. पण विराट 350 नाही तर 475 धावांचं पाठलाग करतोय असं वाटतं. विराट आवेशात येऊन गोलंदाजीमध्ये अनेक बदल करतोय. विराटला गोलंदाजीकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे”, असंही नेहराने म्हटलं.

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | विराटला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ‘या’ दिग्गज कर्णधाराच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी

India vs Australia 2020 | विराटवर कर्णधार पदाचा कोणताही दबाव नाही, सलग दुसऱ्या पराभवानंतर टीकेचा धनी झालेल्या कोहलीची हरभजनकडून पाठराखण

India vs Australia 2020 | कोहलीची कॅप्टन्सी समजणे अवघड, गंभीरचा विराटवर हल्लाबोल

india vs australia 2020 former india bowler ashish nehra criticizes skipper virat kohli

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.