AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind Vs Aus : ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या स्लेजिंगला अश्विनचं जोरदार प्रत्युत्तर, टीम पेन परत तोंड उघडणार नाही!

ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने अश्विनचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला. अश्विननेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. अश्विनच्या प्रत्युत्तरानंतर टीम पेनचं तोंड पाहण्यासारखं झालं होतं.

Ind Vs Aus : ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या स्लेजिंगला अश्विनचं जोरदार प्रत्युत्तर, टीम पेन परत तोंड उघडणार नाही!
| Updated on: Jan 11, 2021 | 3:38 PM
Share

सिडनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus Sydney test) यांच्यातील तिसरा कसोटी सामना…  दुखापतग्रस्त दोन खेळाडू शिवाय ऑस्ट्रेलियाच्या चिवट माऱ्याचा भारतावर कसलाही परिणाम झाला नाही. दुखापतग्रस्त हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि आर. अश्विनने (R Ashwin) चिवट खेळी करत शेवटपर्यंत पीचवर उभे राहून सिडनी कसोटी ड्रॉ केली. ही कसोटी मालिका ड्रॉ झाल्याने मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. याचदरम्यान, ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने (tim paine )अश्विनचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला. अश्विननेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. अश्विनच्या प्रत्युत्तरानंतर टीम पेनचं तोंड पाहण्यासारखं झालं होतं. (India Vs Australia 3rd Test Ravichandran Ashwin reply to tim paine Sledging)

कांगारुंनी टीम इंडियाला विजयासाठी 407 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाला पाचव्या दिवसखेर 5 विकेट्स गमावून 334 धावा करता आल्या. दरम्यान टीम इंडियाला हा सामना जिंकण्याचीही संधी होती. मात्र निर्णायक क्षणी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सेट असलेल्या (Rishabh pant) रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) बाद केलं. परिणामी दुखापतग्रस्त हनुमा विहारी आणि आर. अश्विनने सामना वाचवण्याच्या दृष्टीने खेळ केला. अखेर शेवटपर्यंत दोघांनी पीचवर उभं राहून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या नाकात दम आणला.

अश्विनचं टीम पेनला जोरदार प्रत्युत्तर

भारताचा स्कोअर 319 रन्सवर 5 विकेट होता. नॅथन लायनसमवेत सारेच बोलर्स आर अश्विन आणि विहारीला आऊट करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र दोघा फलंदाजांनी अशी बॅटिंग केली की ऑस्ट्रेलियाच्या नाकात दम आला. शेवटी ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने अश्विनची एकाग्रता भंग करण्याचं काम केलं. पेन म्हणाला, “आता गाबा टेस्टची जास्त वाट पाहू शकत नाही. यापुढची टेस्ट मॅच ब्रिस्बेनच्या गाबावरच होणार आहे”, त्यावर अश्विननेही त्याला तितकंच जोरदार प्रत्युत्तर दिलं. अश्विन म्हणाला,” तुम्ही भारतात खेळायला येण्याची आम्ही वाट पाहू, ती तुमची शेवटची सिरीज असेल”. अश्विनच्या या प्रत्युत्तरानंतर पेनचं तोंड पाहण्यासारखं झालं होतं.

….तर भारत जिंकला असता?

पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला. भारताला विजयासाठी 309 धावांची आवश्यकता होती. पाचव्या दिवशी रहाणे झटपट बाद झाला. त्यानंतर पंत आणि पुजाराने 148 धावांची भागीदारी केली. यामुळे टीम इंडियाच्या विजयाच्या आशा वाढल्या होत्या. मात्र पंत आणि पुजारा ही सेट जोडी बाद झाली. त्यामुळे अश्विन आणि हनुमा विहारीला ड्रॉच्या उद्देशाने खेळ करावा लागला.

जाडेजा फीट असता तर तो मैदानात खेळायला आला असता. जाडेजा इंजेक्शन घेऊन खेळायला येणार असंही म्हटलं जात होतं. मात्र ही दुखापत जाडेजा आणि टीम इंडियाला चांगलीच महागात पडली. जाडेज जर फीट असता, तर सामन्याचा निकाल नक्कीच टीम इंडियाच्या बाजूने असता, अशा प्रतिक्रिया टीम इंडियाच्या समर्थकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. मात्र दुखापतीअभावी जाडेजा खेळू शकला नाही. याचाच फायदा ऑस्ट्रेलियाला झाल्याचं म्हटलं जात आहे.

हे ही वाचा

Aus vs Ind, 3rd Test | जाडेजा मैदानात न उतरल्याचा फायदा, कांगारुंचा लाजिरवाणा पराभव टळला

Ravindra Jadeja | टीम इंडियासाठी मोठा धक्का, जाडेजा इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींना मुकणार

‘तू तो देवमाणूस निकला रे’; दुखापतीनंतरही आक्रमक 97 फटकावणाऱ्या ऋषभ पंतवर कौतुकाचा वर्षाव

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.