AusvsInd: पुजाराने दिवस गाजवला, दिवसअखेर भारत 4/303

सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सिडनी कसोटीत भारताचा हुमकी एक्का चेतेश्वर पुजाराने पहिला दिवस गाजवला. पुजाराने पहिल्याच दिवशी खणखणीत शतक ठोकलं. त्यामुळे दिवसअखेर भारताला 4 बाद 303 अशी मजल मारता आली. पुजारा नाबाद 130 आणि हनुमा विहारी नाबाद 39 धावांवर खेळत आहेत. चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियात धावांचा रतीब कायम ठेवला . पुजाराने सिडनी कसोटीतही खणखणीत शतक ठोकलं. पुजाराचं हे कारकिर्दीतील …

, AusvsInd: पुजाराने दिवस गाजवला, दिवसअखेर भारत 4/303

सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सिडनी कसोटीत भारताचा हुमकी एक्का चेतेश्वर पुजाराने पहिला दिवस गाजवला. पुजाराने पहिल्याच दिवशी खणखणीत शतक ठोकलं. त्यामुळे दिवसअखेर भारताला 4 बाद 303 अशी मजल मारता आली. पुजारा नाबाद 130 आणि हनुमा विहारी नाबाद 39 धावांवर खेळत आहेत. चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियात धावांचा रतीब कायम ठेवला . पुजाराने सिडनी कसोटीतही खणखणीत शतक ठोकलं. पुजाराचं हे कारकिर्दीतील 18 वं कसोटी शतक आहे. पुजाराने 199 चेंडूत 100 धावा ठोकल्या. या मालिकेतील पुजाराने झळकावलेलं हे तिसरं शतक ठरलं. यापूर्वी पुजाराने पहिल्या अॅडलेड कसोटीत  123, तिसऱ्या मेलबर्न कसोटीत 106 धावा केल्या होत्या. त्यानंतर पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि मालिकेतील शेवटच्या कसोटीतही शतक झळकावलं. पुजाराच्या शतकाने भारताने 4 बाद 300 धावांचा टप्पा ओलांडला.

या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कोहलीने पुन्हा एकदा अपयशी के एल राहुलला या कसोटीत संधी दिली. मात्र राहुलला अपयशाचा डाग पुसता आला नाही. राहुल केवळ 9 धावा करुन माघारी परतला. राहुलला जोश हेजलवूडने मार्शकरवी झेलबाद केलं. राहुल झटपट परतला  तरी, प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सेहवाग म्हणून ओळखला जाणारा मयांक अग्रवाल डगमगला नाही. मेलबर्न कसोटीत 76 आणि 42 धावा करणाऱ्या मयांकने या कसोटीतही दमदार 77 धावा केल्या. नॅथन लायनला षटकार ठोकल्यानंतर, त्याच षटकात दुसरा षटकार ठोकण्याचा प्रयत्न फसला. सीमारेषेजवळ मिचेल स्टार्कने त्याचा झेल टिपला. मयांकने 112 चेंडूत 7 चौकार आणि 2 खणखणीत षटकारांसह 77 धावा केल्या.

यांनतर विराट कोहली मैदानात आला. कोहलीने पुजाराच्या साथीने सावरलेला डाव पुढे नेण्यास सुरुवात केली. चहापानापर्यंत दोघांनी विकेट पडू दिली नाही. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीने मजल-दरमजल करत भारताचा धावफलक हलता ठेवला. चहापानापर्यंत 2 बाद 177 अशी मजल मारली असताना, चहापानानंतर कर्णधार कोहली तातडीने माघारी परतला. कोहलीला हेजलवूडने 23 धावांवर बाद केलं. त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेला मिचेल स्टार्कने 18 धावांवर माघारी धाडलं.

रहाणे बाद झाल्यानंतर पुजाराच्या साथीला हनुमा विहारी आला. हनुमाने खराब चेंडूचा चांगलाच समाचार घेत, पुजाराला उत्तम साथ दिली. त्यामुळे दिवसअखेर भारताला 300 धावांचा टप्पा ओलांडता आला.

दरम्यान भारताने शेवटच्या कसोटीसाठी संघात दोन बदल केले आहेत. इशांत शर्माऐवजी कुलदीप यादव आणि रोहित शर्माऐवजी के एल राहुलला संघात स्थान देण्यात आलं. भारताने चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. चौथी कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून इतिहास रचण्याची भारताला संधी आहे.

संबंधित बातम्या

टीम पेनने आधी पंतला डिवचलं, आता पेनच्या पत्नीचीही ‘वादात’ उडी   

रोहितच्या घरी गोंडस बाळाचं आगमन, विमान पकडून हिटमॅन मुंबईकडे   

मेलबर्न कसोटीत भारताची ऑस्ट्रेलियावर मात   

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *