AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Engalnd 1st T 20 | कसोटीनंतर रंगणार टी 20 चा थरार, पहिल्या सामन्यात कोणाला संधी, कोणाला डच्चू?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात (india vs england t 20 series) 12 मार्चपासून टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे.

India vs Engalnd 1st T 20 | कसोटीनंतर रंगणार टी 20 चा थरार, पहिल्या सामन्यात कोणाला संधी, कोणाला डच्चू?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात (india vs england t 20 series) 12 मार्चपासून टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे.
| Updated on: Mar 11, 2021 | 1:35 PM
Share

अहमदाबाद : इंग्लंडला कसोटी मालिकेत पराभूत केल्यानंतर टीम इंडिया टी 20 मालिकेसाठी (India vs England T 20 Series) सज्ज आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 12 मार्चपासून 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील सर्व सामने हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) खेळवण्यात येणार आहेत. दरम्यान या सामन्यात अंतिम 11 अर्थात प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing 11) कोणाला संधी मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (india vs england 1st t20 match at ahmedabad predicted of playing xi)

सलामीची जबाबदारी रोहित शर्मावर (rohit sharma) असणार आहे. रोहित गेल्या काही काळापासून जोरदार कामगिरी करत आहे. रोहितने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत 345 धावा केल्या होत्या. रोहितला टी 20 मालिकेत वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. रोहितला टी 20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याची संधी आहे. यामुळे रोहित या मोसमात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

गब्बर इज बॅक

रोहितला सलामीला साथ देण्यासाठी टीम इंडियाचा गब्बर शिखर धवन येऊ शकतो. धवन टी 20 स्पेशालिस्ट खेळाडू आहे. तो टी 20 मध्ये वेगाने धावा करण्यात माहिर आहे. मात्र रोहितचा साथीदार कोण हे अजूनही ठरलेलं नाही. पहिल्या टी 20 मध्ये कॅप्टन विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. कसोटी मालिकेत विराटला सूर गवसला नव्हता. त्याला धावांसाठी संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे विराटचा टी 20 मालिकेतून जोरदार पुनरागमन करण्याचा मानस असेल.

केएल की श्रेयस?

चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार, हा टीम मॅनेजमेंट समोरचा मोठा प्रश्न आहे. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल हे दोघे चौथ्या क्रमांकाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे या दोघांपैकी एकालाच संधी मिळू शकते. मॅनेजमेंट केएलवर विश्वास दाखवण्याची शक्यता आहे.

रिषभ पंत

रिषभ पंत गेल्या काही काळापासून तुफान फॉर्मात आहे. तो सातत्याने विजयी खेळी साकारतोय. पंत इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय ठरला. तसेच तो विकेटकीपिंगही करतोय. तो टी 20 मालिकेसाठी सज्ज आहे. त्यामुळे पंतकडून चाहत्यांना जोरदार फटकेबाजीची अपेक्षा असणार आहे. पंतच्या खांद्यावर बॅटिंग आणि किपींग अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे.

हार्दिक आणि वॉशिंग्टन सुंदर

हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर 6 आणि 7 व्या क्रमांकाची जबाबदारी असेल. हे दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. दोघांमध्ये एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. दोघेही आक्रमक फलंदाज आहेत. यामुळे या दोघांकडून अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा टीम इंडियाला असेल. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी युजवेंद्र चहलवर असणार आहे. चहल फिरकीमध्ये माहीर आहे. त्यामुळे इंग्लंडसमोर चहलचं आव्हान असणार आहे.

वेगवान गोलंदाजी

वेगवान गोलंदाजीची जबाबदारी शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहर या तिघांवर असेल. शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर चांगली कामगिरी करत आहेत. तर भुवनेश्वर दुखापतीतून सावरलेला आहे. यामुळे भुवी पुनरागमनासाठी सज्ज आहे.

संभावित टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

अशी आहे इंग्लंड टीम : इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.

संबंधित बातम्या :

Ind Vs Eng : भारतीय संघाला झटका, हा खेळाडू फिटनेस टेसमध्ये नापास, सिरीजमधूनही बाहेर!

India vs England : हार्दिक पांड्याचा हा Video इंग्लंडची झोप उडवणार!

India Vs England T 20 : सर्वाधिक षटकार खेचणारे 5 फलंदाज, पहिल्या क्रमांकावर ‘हा’ खेळाडू, रोहितचा नंबर कितवा?

(india vs england 1st t20 match at ahmedabad predicted of playing xi)

Follow Us
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.