India vs England : हार्दिक पांड्याचा हा Video इंग्लंडची झोप उडवणार!

हार्दिक आपल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर एका षटकाच्या आत कसलीही मॅच पलटवण्याची क्षमता बाळगतो. इंग्लंड विरोधात 12 मार्चपासून सुरु होणाऱ्या 5 सामन्यांच्या टी - 20 सिरीजसाठी भारतीय संघाचा हा स्टार ऑलराऊंडर पूर्णपणे तयार आहे

India vs England : हार्दिक पांड्याचा हा Video इंग्लंडची झोप उडवणार!
हार्दिक पांड्या
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 8:26 PM

मुंबई : हार्दिक पांड्या हा भारतीय क्रिकेट संघाचा हुकमी एक्का मानला जातो. मर्यादित षटकांच्या सामन्यातील सर्वात धडाकेबाज फलंदाज अशी त्याची ओळख आहे. हार्दिक आपल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर एका षटकाच्या आत कसलीही मॅच पलटवण्याची क्षमता बाळगतो. इंग्लंड विरोधात 12 मार्चपासून सुरु होणाऱ्या 5 सामन्यांच्या टी – 20 सिरीजसाठी भारतीय संघाचा हा स्टार ऑलराऊंडर पूर्णपणे तयार आहे.(A video from Hardik Pandya on Twitter before the T20 match against England)

हार्दिक पांड्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या बँटिंग आणि बॉलिंगचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो अनेक जबरदस्त शॉट्स लगावताना दिसत आहे. हार्दिकने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो नेटमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे. तसंच या व्हिडीओमध्ये तो अनेक मोठे शॉट्स मारताना दिसत आहे.

12 मार्चची वाट पाहू शकत नाही- पांड्या

हा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर हार्दिकने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘तयारी झाली आहे. आता 12 मार्च रोजी मैदानावर जाण्यासाठी वाट पाहू शकत नाही’. भारतीय संघाच्या या ऑलराऊंडरने ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत जबरदस्त बॅटिंग केली होती आणि भारतीय संघाला टी – 20 सिरीजमध्ये विजय मिळवून दिला होता. त्यानंतर हार्दिकने कोणताही सामना खेळलेला नाही. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर असं सांगितलं जाऊ शकतं की, हार्दिक जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तयार आहे.

इंग्लंड विरोधात कुणाला संधी?

इंग्लंडविरोधात खेळल्या जाणाऱ्या टी-20 सिरीजसाठी सूर्यकुमार यादव, ईशान किशन, राहुल तेवतिया यांसारख्या युवा खेळाडूंना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. तर कसोटी सामन्यात दमदार प्रदर्शन करणाऱ्या ऋषभ पंत आणि भुवनेश्वर कुमार यांचं संघात पुनरागमन झालं आहे. बॉलिंगमध्ये टी नटराजन, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. तर फास्टर बॉलर जसप्रीत बुमराहला टी – 20 मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

पृथ्वी शॉची 185 धावांची धमाकेदार खेळी, धोनी आणि विराटचा विक्रम मोडीत

Sourav Ganguly : रिषभ पंतची धोनीशी तुलना, सौरव गांगुलीची खोचक कमेंट, म्हणतो…

A video from Hardik Pandya on Twitter before the T20 match against England

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....