IPL 2020, MI vs RCB : ख्रिस मॉरिस-हार्दिक पांड्या भिडले, नियमांचं उल्लंघन

दुसऱ्या डावातील 19 व्या षटकादरम्यान हा प्रकार घडला.

IPL 2020, MI vs RCB : ख्रिस मॉरिस-हार्दिक पांड्या भिडले, नियमांचं उल्लंघन


दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 48 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal challengers Banglore) यांच्यात खेळला गेला. या सामन्यातील दुसऱ्या डावात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि ख्रिस मॉरिस (Chris Moris) यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. या दोघांमध्ये झालेल्या शाब्दिक वादामुळे या दोघांकडून आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन झालं. त्यामुळे या दोघांना सामनाधिकाऱ्यांनी समज दिली आहे. IPL 2020 MI vs RCB Violation Of Rules By Hardik Pandya And Chris Morris

नक्की काय घडलं?

बंगळुरुने मुंबईला विजयासाठी 165 धावाचे आव्हान दिले. विजयी आव्हानाचं पाठलाग करताना मुंबईची सावध सुरुवात झाली. मात्र त्यानंतर मुंबईने विकेट्स गमावल्या. मात्र त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या या दोघांनी मुंबईचा डाव सावरला. बोलर ख्रिस मॉरिस दुसऱ्या डावातील 19 वी ओव्हर टाकायला आला. पांड्याने या ओव्हरमध्ये षटकार खेचला. तर यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवर पंड्या कॅच आऊट झाला. बाद झाल्याने पांड्या ड्रेसिंग रुमच्या दिशेनं जात होता. मात्र यादरम्यान मॉरिसने पांड्याला हातवारे करुन डिवचलं. त्यामुळे पांड्याचा राग अनावर झाला. यामुळे या दोघांमध्ये शाब्दिक वाद पाहायला मिळाला.

नियमांचं उल्लंघन

या सर्व प्रकारामुळे मॉरिस आणि पांड्याकडून नियमांचं उल्लंघन झालं. यामुळे सामनाधिकारी असलेले मनु नायर यांनी या दोघांना दोषी ठरवलं.
पांड्यावर आचार संहितेच्या 2.20 नियमांचे उल्लंघ केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर मॉरिसला आचार संहितेच्या 2.5 नियमांचं उल्लंघन केल्यानं दोषी ठरवलं आहे. तसेच यापुढे अशी चूक होता नये, अशी तंबीही सामनाधिकाऱ्यांनी या दोघांना दिली.

विराटने सूर्यकुमारला डिवचलं (Virat-Suryakumar)

बंगळुरुने मुंबईला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. विजयी आव्हानाचं पाठलाग करताना सूर्यकुमार चांगला खेळत होता. विकेट मिळत नसल्याने बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली हतबल झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे विराटने सूर्यकुमारला डिवचण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सामन्यातील दुसऱ्या डावातील 13 व्या षटकादरम्यान घडला. विराट स्ट्राईक एंडला असलेल्या सूर्यकुमारच्या दिशेने गेला. त्याला काहीही न बोलता ठस्सण देण्याचा प्रयत्न विराटने केला. मात्र सूर्यकुमारने विराटला प्रत्युत्तर न देता शांत राहिला, आणि नॉन स्ट्राईक एंडच्या दिशने निघून गेला. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे विराटला नेटीझन्सनी चांगलेच फैलावर घेतले आहे.

मुंबईची प्ले ऑफमध्ये धडक

मुंबईने बंगळुरुवर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह मुंबईने प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे. मुंबई ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्सटेबलमध्ये 16 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, MI vs RCB : सामना एक, किस्से अनेक – सूर्यकुमारला डिवचण्याचा प्रयत्न, हार्दिक-मॉरिसचं शाब्दिक युद्ध, रवी शास्त्रींचा ‘सूर्य’नमस्कार

IPL 2020, MI vs RCB : सूर्यकुमार यादवची धमाकेदार खेळी, मुंबईची बंगळुरुवर 5 विकेट्सने मात, प्ले ऑफमध्ये धडक

IPL 2020 MI vs RCB Violation Of Rules By Hardik Pandya And Chris Morris

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI