Special Story | इंग्लंडचा कर्णधार जो रुटची द्विशतकासह ऐतिहासिक विक्रमी खेळी

इंग्लंडचा कर्णधार जो रुटने ( Joe Root) 377 चेंडूत 19 फोर आणि 2 सिक्ससह 218 धावांची खेळी केली.

Special Story |  इंग्लंडचा कर्णधार जो रुटची द्विशतकासह ऐतिहासिक विक्रमी खेळी
जो रुट

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India Vs England 2021) यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये (MA Chidambaram Stadium) पेटीएम कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळण्यात येत आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटच्या (England Captain Joe Root) कसोटी कारकिर्दीतील हा 100 वा सामना आहे. रुटने या ऐतिहासिक 100 व्या सामन्यातील (Joe Root 100 Test) दुसरा आणि पहिला असे दोन्ही दिवस गाजवले. रुटने दुसऱ्या दिवशी शानदार द्विशतक (Joe Root Double Hundred) पूर्ण केले. तर पहिल्या दिवशी शतकी खेळी केली. रुटने एकूण या खेळीसह त्याने वर्ल्ड रेकॉर्ड केला. तसेच त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आणि बरोबरीही केली.
(India vs England 1st test match at MA Chidambaram Stadium chennai joe root hit double century break many records )

काय आहे वर्ल्ड रेकॉर्ड?

रुट 100 व्या सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला. रुटने दुसऱ्या दिवशी 128 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. रुटने दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकनंतर 145 व्या ओव्हरमध्ये अश्विनच्या गोलंदाजीवर सिक्सर खेचत 341 चेंडूच्या मदतीने द्विशतक पूर्ण केलं. रुटच्या कारकिर्दीतील हे पाचवे दुहेरी शतक ठरलं. विशेष म्हणजे रुट भारताविरोधात द्विशतक झळकावणारा तिसरा इंग्रज फलंदाज ठरला आहे.

चेन्नईत सर्वोच्च खेळी करण्याचा बहुमान

रुट चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये (MA Chidambaram Stadium) सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारा परदेशी फलंदाज ठरला. 211 धावा करताच त्याने हा बहुमान पटकावला. याआधी 1986 मध्ये डीन जोन्सने (Dean Jones) या मैदानात 210 धावा केल्या होत्या.

इंझमाम उल हकचा रेकॉर्ड ब्रेक

रुटने 185 धावा करताच पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकचा विक्रम मोडीत काढला. रुटने 100 व्या कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला. इंझमामने 100 व्या कसोटीत 184 धावांची खेळी केली होती. ही खेळी त्याने टीम इंडिया विरुद्ध 2004-05 मध्ये बंगळुरुत केली होती.

सलग तिसरी दीडशतकी खेळी

रुटने या सामन्यात दीडशतकी खेळी केली. यासह रुटचं हे सलग तिसऱ्या कसोटीतील तिसरं दीडशतक (150) ठरलं. रुटने सलग तिसऱ्यांदा अशी कामगिरी केली. कुमार संगकारा, व्हॅली हमन्ड, सर डॉन ब्रॅडमन, झहीर अब्बास, मुद्दसर नजर, टॉम लॅथमनंतर अशी कामगिरी करणारा रुट सातवा फलंदाज ठरला. विशेष म्हणजे रुट सर डॉन ब्रॅडमॅन यांच्यानंतर अशी कमागिरी करणारा एकमेव कर्णधार ठरला. तसेच रुट परदेशात गेल्या 5 वर्षांमध्ये 150 पेक्षा अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज ठरला.

शतकी खेळी

रुटने 164 चेंडूंच्या मदतीने शतक पूर्ण केलं. सामन्याच्या पहिल्या दिवशी रुटने ही कामगिरी केली. रुटच्या कारकिर्दीतील हे 20 वं शतक ठरलं. विशेष म्हणजे रुट आपल्या कारकिर्दीतील 98, 99 आणि 100 वा सामन्यात शतक लगावणारा तिसरा इंग्रज फलंदाज ठरला. याआधी इंग्लंडच्या कॉलिन काउड्रे आणि अ‍ॅलेक स्टीवर्टने ही कामगिरी केली होती.

15 वा इंग्रज खेळाडू

रुटच्या टेस्ट कारकिर्दीतील हा 100 वा कसोटी सामना ठरला. यासह रुट इंग्लंडकडून 100 सामने खेळणारा 15 वा खेळाडू ठरला. याआधी इंग्लंडकडून अॅलिस्टर कुक, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, अलेक स्टुअर्ट, इयन बेल, ग्रॅहम गूच, डेव्हिड गावर, मायकेल आथर्टन, कॉलिन काऊड्रे, जेफ्री बॉयकॉट, केव्हिन पीटरसन, इयन बोथम, अँड्यू स्ट्रॉस आणि ग्रॅहम थॉर्प यांनी अशी कामगिरी केली.

वेगवान 8 हजार करणारा तिसरा युवा खेळाडू

दरम्यान रुटने नुकतेच कसोटीमध्ये 8 हजार धावांचा टप्पा ओलांडला. नुकत्याच श्रीलंकेविरोधात झालेल्या कसोटी मालिकेत त्याने ही कामगिरी केली. 30 वर्षे 15 दिवसाचा असताना रुटने ही कामगिरी केली. यासह रुट कसोटीत 8 हजार धावा करणारा तिसरा युवा फलंदाज ठरला. रुटने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसला पछाडत ही कामगिरी केली . कॅलिसने वयाच्या 30 वर्ष 193 दिवशी ही कामगिरी केली होती.

संबंधित बातम्या :

India vs england 1st test | इंग्लंडचा कॅप्टन जो रुटचा भीमपराक्रम, 100 व्या मॅचमध्ये धडाकेबाज शतक

India vs england 1st test | टीम इंडिया विरुद्ध मैदानात उतरताच इंग्लंडच्या जो रुटची ऐतिहासिक कामगिरी

(India vs England 1st test match at MA Chidambaram Stadium chennai joe root hit double century break many records )

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI