IND vs ENG 2nd T20 Live Streaming : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरी टी 20 मॅच लाईव्ह स्ट्रीमिंग, कधी आणि कुठे?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात (india vs england t 20 series) दुसरा टी 20 सामना आज (14 मार्च) खेळवण्यात येणार आहे.

IND vs ENG 2nd T20 Live Streaming : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरी टी 20 मॅच लाईव्ह स्ट्रीमिंग, कधी आणि कुठे?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात (india vs england t 20 series) दुसरा टी 20 सामना आज (14 मार्च) खेळवण्यात येणार आहे.

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG 2nd T20) यांच्यात आज (14 मार्च) दुसरा टी 20 सामना खेळवण्यात येणार आहे. या दुसऱ्या सामन्याचं आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या मॅचला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. इंग्लंडने पहिल्या सामन्यात भारताचा 8 विकेट्सने पराभव केला. त्यामुळे इंग्लंड मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. यामुळे या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा पराभव करुन मालिकेत बरोबरी करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल. तर इंग्लंडचा विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान हा सामना कधी आणि कुठे पाहता येईल याबाबत आपण जाणून घेऊयात. (india vs england 2021 2nd t20 match Ahmedabad live streaming when where to watch match from Narendra Modi Stadium india time)

दुसरा सामना कुठे?

उभय संघातील दुसरा टी 20 सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम खेळवण्यात येणार आहे.

सामना किती वाजता सुरु होणार?

या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस उडवण्यात येणार आहे.

सामना कुठे पाहता येणार?

या संपूर्ण मालिकेतील लाईव्ह सामने हे स्टार स्पोर्ट्सवर पाहता येतील. तसेच www.tv9marathi.com या आमच्या वेबसाईटवर तुम्हाला सामन्याचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील.

प्रेक्षकांना संधी असणार का?

दुसऱ्या सामन्यात स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के चाहत्यांना मैदानात उपस्थित राहता येणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमची क्षमता ही एकूण 1 लाख 32 इतकी आहे. त्यानुसार एकूण 66 हजार चाहत्यांना उपस्थितीत राहता येणार आहे.

टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

अशी आहे इंग्लंड टीम : इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.

संबंधित बातम्या :

India vs England 2nd T20I | पराभवानंतरही संघात बदल होणार नाही, आम्ही असेच खेळणार, स्टार खेळाडूची प्रतिक्रिया

Prithvi Shaw | मास्टर ब्लास्टरनं असा काय सल्ला दिला की, पृथ्वीनं रन्सचा पाऊस पाडला?

(india vs england 2021 2nd t20 match Ahmedabad live streaming when where to watch match from Narendra Modi Stadium india time)

Published On - 5:00 am, Sun, 14 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI