Video | ‘हिटमॅन’ रोहितचा धमाका, युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा रेकॉर्ड ब्रेक

रोहित शर्माने (rohit sharma) इंग्लंड विरुद्धच्या (india vs england 5th t20i) पाचव्या टी 20 सामन्यात 64 धावांची खेळी केली. त्याने यामध्ये 5 षटकार लगावले. यासह रोहितने ख्रिस गेलचा (chris gayle) रेकॉर्ड ब्रेक केला.

Video | 'हिटमॅन' रोहितचा धमाका, युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा रेकॉर्ड ब्रेक
रोहित शर्माने (rohit sharma) इंग्लंड विरुद्धच्या (india vs england 5th t20i) पाचव्या टी 20 सामन्यात 64 धावांची खेळी केली. त्याने यामध्ये 5 षटकार लगावले. यासह रोहितने ख्रिस गेलचा (chris gayle) रेकॉर्ड ब्रेक केला.

अहमदाबाद : भारताने इंग्लंडवर निर्णायक असलेल्या (India vs England 5th T20i) पाचव्या टी 20 मॅचमध्ये 36 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडला विजयासाठी 225 धावांचे आव्हान मिळाले होते. पण इंग्लंडला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 188 धावाच करता आल्या. या विजयासह भारताने 3-2 ने मालिकाही जिंकली. हा भारताचा सलग 6 वा टी 20 मालिका विजय ठरला. या सामन्यात टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माने (Hitman Rohit Sharma) युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा (Universe Boss Chris Gayle) विक्रम मोडीत काढला. रोहितने गेलचा सिक्सचा एक रेकॉर्ड ब्रेक केला आहे. (india vs england 5th t20i rohit sharma break chris gayle record)

काय आहे रेकॉर्ड?

रोहितने या मॅचमध्ये 34 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह 64 धावांची तुफानी खेळी केली. यासह रोहित टी 20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक सिक्सर लगावणारा पहिला फलंदाज ठरला. रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये बॅटिंग करताना 5 किंवा त्यापेक्षा अधिक सिक्स मारण्याची ही 10 वी वेळ ठरली. रोहित या सामन्याआधी या रेकॉर्डबाबतीत गेलच्या बरोबरीत होता. पण आता रोहितने गेलला पछाडलं आहे. त्यामुळे रोहित पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. तसेच आता कॉलिन मुनरो आणि ख्रिस गेल संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांनी प्रत्येकी एका डावात एकूण 9 वेळा 5 किंवा त्यापेक्षा अधिक सिक्स मारण्याचा कारनामा केला आहे.

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज

रोहितने या सामन्यात अर्धशतकासह आणखी एक विक्रम केला. रोहित टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. रोहितने न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलला पछाडत दुसरं स्थान पटकावलं. रोहितने 40 धावा पूर्ण करताच हा विक्रम आपल्या नावे केला. ताज्या आकडेवारीनुसार आता टी 20 मध्ये रोहितच्या नावे 111 सामन्यात 2 हजार 864 धावांची नोंद आहे.

दरम्यान या टी 20 मालिकेत भारताने शानदार विजय मिळवला. यानंतर आता उभय संघात 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या सीरिजला 23 मार्चपासून सुरुवात होत आहे. या तिनही सामन्यांचे आयोजन हे पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

Rohit Sharma | ‘हिटमॅन’ रोहितचा धमाका, मार्टिन गुप्टीलचा रेकॉर्ड ब्रेक, विक्रमाला गवसणी

India vs England T20 Series 2021 | टीम इंडियाचा सलग सहावा टी 20 मालिका विजय

(india vs england 5th t20i rohit sharma break chris gayle record)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI