AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

R Ashwin | फिरकीने कमाल, बॅटिंगने धमाल, अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विन ठरला ‘मॅन ऑफ द सीरिज’

आर अश्विनने (r Ashwin ) इंग्लंड विरुद्धच्या या कसोटी मालिकेत 32 विकेट्ससह 189 धावांची खेळी केली. या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने (Man of The Series awards) गौरवण्यात आलं.

R Ashwin | फिरकीने कमाल, बॅटिंगने धमाल, अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विन ठरला 'मॅन ऑफ द सीरिज'
आर अश्विनने इंग्लंड विरुद्धच्या या कसोटी मालिकेत 32 विकेट्ससह 189 धावांची खेळी केली. या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने (Man of The Series awards) गौरवण्यात आलं.
| Updated on: Mar 06, 2021 | 6:43 PM
Share

अहमदाबाद | भारताने इंग्लंडचा अहमदाबादमधील चौथ्या कसोटीत (india vs england 4th test) इंग्लंडवर डाव आणि 25 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांची कसोटी मालिका 3-1 ने जिंकली. तसेच टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम साम्यात धडक मारली. दरम्यान या चौथ्या सामन्यात फिरकीपटू आर अश्विनने (R ashwin) विजयी भूमिका बजावली. अश्विनने या सामन्यात एकूण 8 विकेट्स घेतल्या. अश्विनने संपूर्ण मालिकेत बोलसह बॅटिंगनेही दमदार कामगिरी केली. त्याने केलेल्या या कामगिरीसाठी अश्विनला मॅन ऑफ द सीरिज (Ashwin Man of The Series) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. (india vs england test series 2021 r Ashwin win Man of The Series awards)

अश्विनची या मालिकेतील कामगिरी

अश्विनने या संपूर्ण मालिकेत पाहुण्या इंग्लंडला आपल्या फिरकीवर नाचवलं. अश्विनने या एकूण 4 टेस्ट मॅचमध्ये 14. 72 सरासरीने एकूण 32 विकेट्स पटकावल्या. अश्विनने या सीरिजमध्ये 400 विकेट्सचा टप्पा पार केला. सोबतच अश्विनने चेन्नईतील दुसऱ्या कसोटीत आपल्या होमपीचवर खणखणीत शतक लगावलं. अश्विनने या 4 सामन्यांच्या मालिकेत 31. 50 च्या एव्हरेजने 189 धावा केल्या.

कसोटी मालिकेत दुसऱ्यांदा 30+ विकेट्स

अश्विनने इंग्लंड विरुद्धच्या या सीरिजमध्ये 32 विकेट्स मिळवल्या. अश्विनने कसोटी मालिकेत अशी कामगिरी करण्याची दुसरी वेळ ठरली. याआधी अश्विनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 31 बळी घेण्याची कामगिरी केली होती.

भारताकडून सर्वाधिक वेळा मालिकावीर पुरस्कार

अश्विन टीम इंडियाकडून सर्वाधिक वेळा कसोटीमध्ये मालिकावीर पुरस्कार पटकावणारा खेळाडू आहे. अश्विनने आतापर्यंत एकूण 29 कसोटी मालिकांमध्ये खेळला आहे. त्यापैकी त्याने 8 वेळा ‘मॅन ऑफ द सीरिजचा’ बहुमान मिळवला आहे. या यादीत टीम इंडियाकडून दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर आहेत.

संबंधित बातम्या :

Video | ‘लिटील मास्टर’ सुनील गावसकर यांचे अनोखे ‘अर्धशतक’, बीसीसीआयकडून विशेष सन्मान

India vs England 4Th Test | अश्विन-अक्षरने इंग्लंडला लुटलं, 70 पैकी जवळपास 60 विकेट्स दोघांनाच !

ICC Test ranking : इंग्लंडला धूळ चारत टीम इंडिया बनली जगातली नंबर वन टीम

(india vs england test series 2021 r Ashwin win Man of The Series awards)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.