AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs England 4Th Test | अश्विन-अक्षरने इंग्लंडला लुटलं, 70 पैकी जवळपास 60 विकेट्स दोघांनाच !

इंग्लंड विरुद्धच्या या कसोटी मालिकेत आर अश्विन ( r ashwin) आणि अक्षर पटेल (axar patel) या फिरकी जोडीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या.

India vs England 4Th Test | अश्विन-अक्षरने इंग्लंडला लुटलं, 70 पैकी जवळपास 60 विकेट्स दोघांनाच !
इंग्लंड विरुद्धच्या या कसोटी मालिकेत आर अश्विन ( r ashwin) आणि अक्षर पटेल (axar patel) या फिरकी जोडीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या.
| Updated on: Mar 06, 2021 | 5:16 PM
Share

अहमदाबाद : टीम इंडियाने इंग्लंडवर चौथ्या कसोटीत (India vs England 4Th Test) एक डाव आणि 25 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने ही कसोटी मालिका 3-1 च्या फरकाने जिंकली. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (Wordl Test Championship 2021) अंतिम सामन्यातही धडक मारली. भारताने इंग्लंडला दुसऱ्या डावात 135 धावांवर रोखले. दुसऱ्या डावात टीम इंडियाकडे 160 धावांची आघाडी होती. इंग्लंडला 135 धावांवर रोखल्याने भारताने डावासह 25 धावांनी विजय मिळवला. भारताच्या आर अश्विन (R Ashwin) आणि अक्षर पटेल (axar patel) या फिरकी जोडीनेच इंग्लडला ऑल आऊट केलं. या दोघांनी फाईव्ह स्टार कामगिरी केली. या दोघांनी दुसऱ्या डावात प्रत्येकी 5 विकेट्स घेतल्या. या सामन्यात अश्विनने एकूण 8 तर अक्षरने 9 विकेट्स मिळवल्या. तसेच या जोडीने या मालिकेत एकूण 70 पैकी 59 विकेट्स घेतल्या. (india vs england 4th test r ashwin and axar patel takes most wickets in test series)

फिरकीवर इंग्लंडला गिरकी

या जोडीने संपूर्ण मालिकेत आपल्या फिरकीने इंग्लंडला नाचवलं. अश्विन आणि अक्षरने या सीरिजमध्ये एकूण 59 विकेट्स घेतल्या. यापैकी 32 विकेट्स या अश्विनने घेतल्या. तर अक्षरने 27 विकेट्स मिळवल्या. या दरम्यान दोघांनी अनेकदा 5 विकेट्सही घेतल्या.

अश्विनची ऑलराऊंड खेळी

अश्विनने या संपूर्ण मालिकेत एकूण 32 विकेट्स घेतल्या. त्याने यादरम्यान 400 विकेट्स घेण्याचा किर्तीमान केला. सोबतच अश्विनने चेन्नईतील दुसऱ्या कसोटीत शतकी खेळी केली. अश्विनने या संपूर्ण मालिकेत 189 धावाही केल्या. अश्विनला त्याने केलेल्या या अष्टपैलू कामगिरीसाठी ‘मालिकावीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अक्षर पटेलची शानदार कामगिरी

अक्षर पटेलने दुसऱ्या कसोटीतून पदार्पण केलं.त्याने पदार्पणातील सामन्यापासून आपल्या फिरकीने पाहुण्या इंग्लंडला नाचवलं. त्याने या मालिकेतील एकूण 27 विकेट्स घेतल्या. तसेच त्याने एकूण 4 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. यासह अक्षर पदार्पणातील मालिकेत 27 विकेट्स घेणारा तिसरा भारतीय ठरला. याआधी टीम इंडियाकडून दिलीप दोशी आणि शिवलाल यादव या दोघांनी अशी कामगिरी केली होती.

कसोटीनंतर रंगणार टी 20 चा थरार

दरम्यान आता कसोटी मालिकेनंतर टी 20 सीरिजचा थरार रंगणार आहे. या मालिकेत एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. या सर्व सामन्यांचे आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. 15 मार्चपासून या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे.

संबंधित बातम्या :

ICC Test ranking : इंग्लंडला धूळ चारत टीम इंडिया बनली जगातली नंबर वन टीम

India vs Engaland 4th Test Day 3 Live | अश्विन-अक्षर फिरकी जोडीचा ‘पंच’, भारताचा इंग्लंडवर डाव आणि 25 धांवानी विजय, वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपच्या अंतिम सामन्यात धडक

(india vs england 4th test r ashwin and axar patel takes most wickets in test series)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.